30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रअजित चव्हाण यांची भाजपच्या सहमुख्य प्रवक्ते पदावर निवड

अजित चव्हाण यांची भाजपच्या सहमुख्य प्रवक्ते पदावर निवड

पत्रकारितेच्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या अजित चव्हाण (Ajit Chavan) यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ते पदावर निवड केली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित चव्हाण यांची भाजप प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड केली होती. प्रवक्तेपदाच्या काळात त्यांनी आक्रमक शैलीत पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. (Ajit Chavan has been elected as BJP’s joint chief spokesperson)

हे सुद्धा वाचा

बनावट कामगार नेत्यांचे कंबरडे मोडा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

Devendra Fadanvis : फडणवीस म्हणतात, येणाऱ्या लोकसभेला भाजप चमत्कार करेल!

VIDEO : धक्कादायक; प्रीस्क्रिप्शन लिहीत असतानाच हृदयरोगतज्ञाला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू

 

आपली आक्रमक शैली आणि हजरजबाबीपणा यामुळे अजित चव्हाण यांनी पक्षात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांचा पत्रकारितेतील अनुभवही दांडगा आहे. राजकारण आणि समाजकरणातही चव्हाण यांना मोठा अनुभव आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातही ते अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखले जातात. पत्रकारिता करताना सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थपित झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या याच अनुभवाचा भाजपला फायदा होईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.

अजित चव्हाण यांच्या रूपात अभ्यासू आणि एक तरुण चेहरा भाजपला मिळाला आहे. “झी २४ तास” या प्रसिद्ध वृत्त वाहिनीत न्युज अँकर म्हणून काम करताना त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. अजित चव्हाण यांनी आपल्या पक्षाची बाजू अतिशय भक्कमपणे मांडली. त्यामुळेच त्यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केल्यामुळे अवघ्या वर्षभरातच त्यांची महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ते पदावर निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांनी आपल्यावर हा विश्वास दाखविलबद्दल अजित चव्हाण यांनी ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत. भाजप नेत्या चित्र वाघ यांनी अजित चव्हाण यांचे सहमुख्य प्रवक्ते पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी