28 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमहाराष्ट्रAjit Pawar : या सरकारचा पर्दाफाश करणार, अजित पवारांकडून सूचक वक्तव्य

Ajit Pawar : या सरकारचा पर्दाफाश करणार, अजित पवारांकडून सूचक वक्तव्य

राज्यात रोजगार निर्मितीचे आमिष देत केवळ अनेकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असल्यामुळे हा वाद आणखी चिघळत चालला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील अनेक महत्त्वपूर्ण बडे उद्योग गुजरात आणि इतर अन्य राज्यांत गेल्यामुळे विरोधी पक्षाच्या गोटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्यात रोजगार निर्मितीचे आमिष देत केवळ अनेकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत असल्यामुळे हा वाद आणखी चिघळत चालला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल करत या सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजित पवार नेमकं काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सरकारला धारेवर धरत रोजगाराच्या थापांवर सडकून टीका सुद्धा केली आहे.

शिरूर तालुक्यात घोडगंगा साखर कारखान्याच्या प्रचार सभेसाठी अजित पवार आले असता त्यांनी त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात 75 हजार नोकऱ्या देणार यासाठी भाजपने प्रचार केला. ती चालू प्रोसेस असते. मधल्या काळात महाराष्ट्रमध्ये मोठे उद्योग परराज्यात जात आहे. यामुळे सरकारला त्यांचचं मन त्यांना खायला उठलं आहे, म्हणून ते प्रचार करत आहेत. भरती संदर्भात दोन वेगवेगळी नावं असताना एक नाव सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. माझ्याकडे सगळं सविस्तर आहे. मी शिर्डीच्या अधिवेशनात सगळं सांगणार आहे आणि या सरकारचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगत पवार यांनी सांगितले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले आहे.

हे सुद्धा वाचा…

Jobs in IT Sector in India : ही भारतीय IT कंपनी 20,000 लोकांना देणार नोकऱ्या! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dairy Products : बऱ्याच लोकांना दुग्धजन्य पदार्थ सोडणे आवश्यक आहे, कारणे जाणून घ्या

Suryakumar Yadav : भारताचा ‘सूर्या’ तळपतोय; आयसीसी रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर

अजित पवार पुढे म्हणाले, आम्हीही अनेक वर्षे सरकारमध्ये कामं केली आहे. त्यामध्ये शिक्षक भरती सुरू असते, पोलीस भरती सुरू असते. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना 5 वर्षांत 65 हजार पोलिसांची भरती केली होती. त्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरूच असते. परंतु आता काय झालं, लाखो तरुणांना आणि तरुणींना रोजगार देणारे आणि लाखो कोटी रुपये गुंतवणूक असणारे महाराष्ट्रातील मोठे उद्योग गेल्या काही काळात परराज्यात गेले. याचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातील जनतेत मोठ्या प्रमाणावर झाला, यामुळे त्यांचच मन त्यांना खायला लागलं आहे असे म्हणून सत्ताधाऱ्यांची नेमकी कोंडी कुठे झाली हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आता आम्ही यापेक्षा मोठे कारखाने आणू, असे आता दावे करत आहेत. पुण्यामध्ये कारखाने आणले, असा केला. पण किती रोजगार तर फक्त पाचशे ते हजार. वास्तविक याला काहीही अर्थ नाही. यासंदर्भात माझ्याकडे सर्व डिटेल्स आहेत. दोन दिवसांचं अधिवेशन शिर्डीला आहे. त्या अधिवेशनात मी सगळं सांगणार आहे आणि कारण नसताना श्वेतपत्रिका काढणार, असं हे सरकार सांगत आहे असे म्हणून सरकाच्या मनसुब्याच्या पर्दाफार्श करणार असल्याचे राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुद्धा उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान अजित पवार म्हणाले, मी कधीही चुकीचं बोलत नाही. वस्तू स्थितीवर आधारित बोलत असतो. मी घोडगंगेच्या प्रचाराला आजच आलो नाही, अनेक वेळा आलो आहे. मी कारखान्याची सर्व माहिती घेऊनच बोलतो. विरोधक बोलतात की या कारखान्यावर साडेचारशे कोटीचे कर्ज आहे, असं काही नाही. जे आकडे मी सांगितले तेवढेच कर्ज आहे, असे म्हणत पवारांनी सत्ताधाऱ्यांनाच मिश्किल टोला लगावला. याचवेळी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर मिळण्याची आमची भूमिका सुद्धा स्पष्ट केली. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!