30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरमहाराष्ट्रकोरोना काळात नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या ‘एमपीएससी’च्या उमेदवारांना न्याय...

कोरोना काळात नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या ‘एमपीएससी’च्या उमेदवारांना न्याय द्यावा : अजित पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत संयुक्त परीक्षा ‘गट – ब 2020’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काढण्यात आलेल्या जाहिरातीत कोणत्या वर्षाचे नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र आवश्यक आहे, हे नमुद करण्यात आले नव्हते. तसेच हा कालावधी कोविड कालावधी होता. या तांत्रिक अडचणींमुळे सन 2019-20 सालचे नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी व सेवेत हजर होणेसाठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे, तरी ही या उमेदवारांना योग्य न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar Said Justice should be given to MPSC candidates who could not submit Non creamy layer certificate during Corona)

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त परीक्षा ‘गट – ब, 2020’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काढण्यात आलेल्या जाहिरातीत कोणत्या वर्षाचे नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र आवश्यक आहे हे नमुद करण्यात आले नव्हते. हा कोवीडचा काळ असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र काढलेले नव्हते. तसेच ‘एमपीएससी’च्या जुन्या वेबसाईट मध्ये नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती.

हे सुद्धा वाचा

बागेश्वर नावाच्या भोंदू बाबावर कारवाई करण्याची धमक सरकार दाखवत नाही : पटोले

खत खरेदी करताना जात नोंदविण्याच्या प्रकारावर अजित पवार आक्रमक; अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

शिंदे-फडणवीस सरकार कृषि खात्यातल्या बदल्या, पदोन्नती आणि भरतीमध्ये अडकलंय; अजित पवार यांचा घणाघात

आता केवळ तारखेच्या तांत्रिक कारणामुळे सन 2019-20 सालचे नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी व सेवेत हजर होणेसाठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे. परीक्षेमध्ये पात्र होऊनही तारखेच्या तांत्रिक बाबींमुळे उमेदवारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तरी 2021-22 या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र पोलीस भरती प्रमाणेच स्विकारण्याची किंवा जुने काढण्याची परवानगी द्यावी, कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी