33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या चुकीमुळे मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली : अजित पवार

शरद पवारांच्या चुकीमुळे मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली : अजित पवार

राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congrss) आघाडीने 2004 साली विधानसभा निवडणुका (2004 Assembly Elections) जिंकल्यानंतर राष्ट्रवादी मोठा पक्ष असताना देखील मुख्यमंत्रीपद (Chief Minister post) मिळवता आले नाही, ही पक्षातील वरिष्ठांची मोठी चूक असल्याचे सांगत विधान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव न घेता आपल्या भावना व्यक्त केल्या. शुक्रवारी (दि. ३) लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी पक्षातील मोठे नेते आर. आर. पाटील, छगन भुजबळ यांना किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात ज्यांना मुख्यमंत्री करायचे होते, त्यांना मुख्यमंत्री करायचे होते. मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादीकडे आले असते तर त्यात शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता, असे अजित पवार यावेळी म्हणाले. (Ajit Pawar said reason for not getting the post of Chief Minister in 2004)

नशिबाची साथ लागते !
2004 साली राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद न घेण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, त्यावेळी आम्ही ज्युनिअर होतो. मधुकर पिचड, पटेल, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते हे वरिष्ठ नेते निर्णय प्रक्रियेत होते. त्यांनी सांगायचे आणि आम्ही जी म्हणायचे, अशी परिस्थिती होती. आपण कितीही काही म्हटले तरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते, पण नशिबाची कुठेतरी साथ लागते. असे सांगतानाच अजित पवार म्हणाले, देशात पंतप्रधानपदाच्या योग्यतेची अनेक माणसे होती आणि आहेत; पण सगळ्यांना ते पद मिळते का? अगदी महापौरपद, मुख्यमंत्रिपद असेल. सगळ्यांच्या ठिकाणी नशिबाची साथही आवश्यक असते, असते असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. २०२४ ला मुख्यमंत्रीपदाची संधी आल्यास काय कराल याप्रश्नावर पवार म्हणाले, आत्याबाईला मिशा असत्या तर काय झाले असते. असे म्हटल्यासारखे होईल. त्यापेक्षा मुख्यमंत्री झाल्यावर काय करीन ते दाखवतो असे गंमतीशीर उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिले.

 हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांनो सावधान! १०- १२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास होणार कठोर शिक्षा

जगाला वेड लावणारे फेसबूक झाले 19 वर्षांचे !

धोक्याची घंटा : मुंबईतील दूषित हवेमुळे होतोय फुफ्फुसाचा कर्करोग

”…म्हणून 2004 साली सरकार पडले”
मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी 2004 सालचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार पडण्यामागचे कारण देखील सांगितले. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातील काम पहायचे, दिल्ली आणि राज्यातील राजकारणात मोठे अंतर असते. चव्हाण यांना आमदारकी आणि मंत्रिमंडळातील कामाचा अनुभव नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यावेळी एकमेकांना साथ देण्याऐवजी काहींना आमचे विरोधक जवळचे वाटले, त्याचा फटका बसल्याने सरकार पडल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी