34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रअख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला...

अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !

टीम लय भारी

वर्धा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील कान्होली गावाला भेट दिली (Ajit Pawar visited the flood affected Kanholi village). यावेळी त्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांच्यासोबत संवाद सुद्धा साधला. अजित पवार यांनी कान्होली गावाला भेट देताच ग्रामस्थांनी यावेळी गावात पूर आल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांना माहिती दिली.

अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !

हिंगणघाट तालुक्यातील कान्होली हे गाव वर्धा आणि यशोदा नदीच्या संगमावर आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर कान्होली गाव चार दिवस पाण्याखाली होते. त्यामुळे गावात घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले असून पण अद्यापही राज्य सरकारकडून यावर कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाही. तर राज्यातील काही जिल्ह्यात आपत्ती उद्भवलेली असताना देखील राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार पण रखडलेला आहे.

अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुरग्रस्तांच्या घरात जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पूरग्रस्त ग्रामस्थांनी सुद्धा अजित पवारांना सविस्तर माहिती दिली. त्यामुळे राज्य शासनाने जलदरीतीने पंचनामे करून पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या दौऱ्यावेळी केली.

अख्खं गाव चार दिवस पाण्यात; अजित पवारांनी घरात जाऊन अश्रू पुसण्याचा केला प्रयत्न !

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पूरस्थिती निर्माण झालेल्या गावांबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून काय निर्णय घेण्यात येतील, याकडे पूरग्रस्त ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे सुद्धा वाचा :

काय ते मुख्यमंत्री.. काय ते उपमुख्यमंत्री..सगळं ओक्के मध्ये नाहीये, आंबादास दानवेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात आणखी एक जिल्हा निर्माण होण्याची शक्यता

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी