32 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरमहाराष्ट्रअमृता फडणवीस लाच प्रकरण : अनिल जयसिंघाणीच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय

अमृता फडणवीस लाच प्रकरण : अनिल जयसिंघाणीच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय

अमृता फडणवीस धमकी आणि लाच देण्याच्या प्रयत्न प्रकरणातील आरोपी अनिल जयसिंघानीच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय सुनावणी झाली. आरोग्य ठिक नसल्याचे कारण देत, तसेच आरोपी पळून जाणार नसल्याची ग्वाही देत जयसिंघानीच्या वकिलाने जामिनाची मागणी केली. मात्र सरकारी वकिलांनी जयसिंघानी यांच्या जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालय शुक्रवारी (दि. ३१) रोजी जामिनावर निकाल देणार आहे.

अनिल जयसिंघानीच्या वकिलाने जयसिंघानीच्या आरोग्य ठिक नसल्याचा आधार घेत जामीन देण्याची मागणी केली. त्याचबरोबर या प्रकरणाची तपास पूर्ण झालेली आहे, आणि आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. आरोपी कुठेही पळून जाणार नाही. म्हणून अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी एडवोकेट मनान संघाई यांनी केली. मात्र सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी कोर्टासमोर सांगितलं की या प्रकरणात जो व्हिडिओ पाठवण्यात आलेला होता. तो मोबाईल अद्याप हस्तगत झालेला नाही. त्याचबरोबर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. अनेक वर्षापासून फरार होता म्हणून सध्या त्याला जर जामीन दिला तर तो तपासात अडथळा आणू शकतो. म्हणून त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला. माननीय सत्र न्यायाधीश यांनी दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून घेतला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. मात्र अनिल जयसिंघानीच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालय उद्या शनिवारी आपला निर्णय सुनावणार आहे.

दरम्यान सत्र न्यायालयाने अनिल जयसिंघानीची ट्रांजिस्ट रिमांड मध्य प्रदेश पोलिसांना दिला आहे. मध्यप्रदेशच्या दामोह पोलीस ठाण्या मध्ये अनिल जयसिंघानीच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात मध्य प्रदेश पोलीस पुढील तपास करणार आहेत आणि त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी सिंघानीला पुन्हा मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. त्यानंतर त्याची कस्टडी गोवा पोलीस घेण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा 
30 कोटींची संपत्ती असणाऱ्या IASच्या आजी-आजोबांनी जीवन संपवलं!
मुंबई हायकोर्टाने धरले शिंदे-फडणवीस सरकारचे कान; ‘या’ कारणामुळे आमदार निधी वाटपाला स्थगिती
नाशिकच्या काळा राम मंदिरात संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव!  

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी