27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रअमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

टीम लय भारी 

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. याआधी फडणवीस यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांनी गाणे कधी लाॅन्च होणार याबाबत सांगितले होते. दरम्यान फडणवीस यांच्या गाण्याचे किस्से आणि नेटकऱ्यांची त्यावरील प्रतिक्रिया नेहमीच चर्चेचा विषय ठरत असल्याने यावेळी सुद्धा लोक कसे व्यक्त होतील हे पाहणे आता गमतीशीर ठरणार आहे.

दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी त्यांचे ‘वो तेरे प्यार का गम’ हे नवे गाणे लाॅन्च होणार असल्याचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितले होते आणि सोबतच गाण्याचे पोस्टर सुद्धा पोस्ट केले होते, त्यानंतर आज त्यांनी लाॅन्च झालेले गाणेच  ट्विटर वर पोस्ट केले आहे.

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

दरम्यान, आधीच्या गाण्याच्या पोस्टनंतर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे, त्यामध्ये अनेकांनी अमृता फडणवीस यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे तर कोणी नेहमीप्रमाणे टीका करीत हसण्यात दंग दिसून येत आहेत.

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

काही प्रतिक्रिया नक्कीच वाचनीय आहेत, एक व्यक्ती म्हणते, “खूप छान आवाज आणि गोड आवाज अगदी भारताची गान कोकीळा लता दीदी सारखा… तुम्ही तुमच्या कला सादर करीत राहा मॅम आपल्या गायनाची भुरळ येणाऱ्या काळात पुर्ण देशाला पडेल प्रयत्न करीत राहा”, असं म्हटलंय, तर कोणी ‘युनिक व्हाॅईस’ म्हणून कौतुकाचे गोडवे गायले आहेत.

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

दरम्यान टीकाकारांनी पण आपले बाण सरसावून टीका केलीच आहे, “खूपच वेगळा आवाज आहे, जनता खूपच सोशिक आहे आपली इतका कातील आवाज आहे की आवाजानीच जीव घ्याल असे म्हणून एका व्यक्तीने टीका केली आहे, तर गाणं ऐकणाऱ्यांसाठी उद्या एक दिवस सुट्टी ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन”, असे एकाने म्हटले आहे. यावर सुद्धा अनेकांना हसून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

दरवेळी गाण्यातून वेगळेपण घेऊन येणाऱ्या अमृता फडणवीस श्रोतूवृंदावर आपली जादू दरवेळी कायम ठेवताना पाहायला मिळतात, शिवाय आजच त्यांचे नवे गाणे लाॅंन्च झाले असून ही पुन्हा नेटकऱ्यांसाठी मेजवानी ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकारण पेटलं! शिंदे गटातील ‘या’ तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

VIDEO : चिंता नको… ‘यात्री’सोबत करा आता सुखद प्रवास

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!