31.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमहाराष्ट्रअमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओव्दारे होळीच्या हटके शुभेच्छा

अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओव्दारे होळीच्या हटके शुभेच्छा

देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत असून विविध पक्षातील राजकीय मंडळी देखील होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा देत आहेत. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आज देखील त्यांनी होळीच्या अशाच काही हटके शुभेच्छा ट्विटरवरुन दिल्या आहेत. त्यांच्या या ट्विटची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अमृता फडवणी यांनी आपल्यामुलीसह त्यांच्या घरातील पाळीव पोपटाचा व्हिडीओ शोशल मीडियावर शेअर करत पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Amruta Fadnavis’ video on social media for Holi wishes)

अमृता फडवणीस या गायिका म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. राजकीय घडामोडींवर देखील त्या अनेकदा भाष्य करतात त्यामुळे त्यांचे नाव नेहमी चर्चेत असते. त्यांनी गाण्यांच्या माध्यमातून आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्मान केली आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा पुढाकार असतो. अमृता फडवणीस त्यांच्या विविध क्षेत्रातील कामांची माहिती सोशल मीडियावरुन देत असतातच पण सांस्कृतिक महोत्सव, सणांच्या देखील शुभेच्छा सोशल मीडियावर देतात.


आज होळी निमित्त त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच हटके शुभेच्छा दिल्या आहेत. “धरती के सभी प्रणियो को होली की शुभकामनाएँ!” असे कॅप्शन देत त्यांनी आपली मुलगी दिवीजा आणि घरातील पाळीव पोपटाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे.

हे सुद्धा वाचा
Video : वयाच्या सत्तरीत आजी-आजोबांचं शुभमंगल! शिरोळ वृद्धाश्रमातील आनंददायी बातमी

दर्शनची आत्महत्या जातीवादामुळे नाहीच; IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण अधिक गुंतागुंतीचे


टॅक्सीत पॅनिक बटन लावण्यास टॅक्सी चालकांचा विरोध; वाचा नेमकं कारण

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी