29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरमहाराष्ट्रAnandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात

Anandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आनंदाचा शिधा यापुढे ऑनलाईन नाही तर ऑफलाईन देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा आनंदाचा शिधा यापुढे ऑनलाईन नाही तर ऑफलाईन देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली. सर्वसामान्य जनतेची दिवाळी आनंदात जावी, यासाठी या विद्यमान सरकारकडून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या आनंदाच्या शिधामध्ये पात्र धारकांना फक्त 100 रुपयांमध्ये एक किलो साखर, एक किलो चना डाळ, एक किलो रवा आणि एक लिटर पामतेल असे देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. पण आता या आनंदाच्या शिधामधून तेलाची पिशवी गायब असल्याचे लोकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे 75 रुपयांमध्ये लोकांना रास्त दुकानदाराकडून रवा, डाळ आणि साखरेचे वाटप करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनांदाचा शिधा ऑफलाईन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पात्र धारकांनी रेशनिंग दुकानात गर्दी केली. परंतु शासनाकडून आनंदाच्या शिधामधील सर्व अद्यापही दुकानात आलेल्या नाहीत, असे सांगताना मात्र रास्त दुकानदारांची पुरती दमछाक होत आहे. पण यासाठी आता नागरिकांना 125 रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.

राज्य सरकारकडून देण्यात येत असलेल्या आनंदाच्या शिधामधील तेलाची पिशवी गायब असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राज्यातील अनेक रास्त दुकानदारांकडे फक्त चना डाळ, राव आणि साखर याच वस्तू पोहोच झाल्या आहेत. त्यामुळे लोकांना पामतेलाची पिशवी बाहेरून विकत घ्यावी लागत आहे, ज्यासाठी नागरिकांना अधिकचे 125 रुपये द्यावे लागत आहे. ज्यामुळे या आनंदाच्या शिधामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागत आहे.

हे सुद्धा वाचा

Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

MLA Kailas Patil Fasting: ठाकरे गटाच्या आमदाराला आम आदमी पक्षाचा पाठींबा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आजपासून उपोषण

दरम्यान, राज्य सरकारचा हा आनंदाचा शिधा घोषित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. दिवाळी आलेली असली तरी आनंदाचा शिधा मात्र सामान्य नागरिकांपर्यंत न पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता या शिधेमधून तेलच गायब असल्याने नागरिकांडी संताप व्यक्त केला आहे. तर विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांना आनंदनाचा शिधा घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी रेशनिंग दुकानात सामान घेण्यासाठी गर्दी केली. परंतु अपूर्ण शिधा पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली. तर काही लोकांनी रास्त दुकानदारच कमी वस्तू देत असल्याचा आरोप करत गोधळ घालण्यास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आधीच चिंतेत पडला आहे. सरकारकडून देखील अद्याप याबाबत काहीच मदत जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसून येतंय. त्यात आता शासनाकडून मिळणारा शिधा देखील अपूर्ण असल्याने शेराकरी वर्गाने आता सरकारविरोधात असांतोष व्यक्त केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!