28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमहाराष्ट्रआता रस्त्यावर उतरून लढायचे...अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; दिला बेमुदत संपाचा इशारा

आता रस्त्यावर उतरून लढायचे…अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; दिला बेमुदत संपाचा इशारा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढविण्यावरून राज्य सरकारचा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. अंगणवाडी सेविकांच्या अनेक समस्या तशाच प्रलंबित आहे. त्यातच मानधन वाढविण्यावरून राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने साडेपाच वर्षांपूर्वी पगारवाढ केली. केंद्र सरकारने पगारवाढ करून साडेचार वर्षे उलटली आहेत. सोबतच, कोरोनाला दूर करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत केली. पण त्याचा परिणाम काय झाला? असा सवाल करत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.  (Anganwadi workers are get aggressive; An indefinite strike warning was given)

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने निवेदनात म्हटले आहे की,’ महागाई दुप्पटीने वाढली पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांच्या (Anganwadi) भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील गायब केल्या. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने जुना मोबाईल भंगारात जायच्या लायकीचा होऊनही, आपण वर्षभरापासून नवीन मोबाईलसाठी आंदोलन करूनही नवीन मोबाईल दिलेला नाही’. अशा बऱ्याच कारणास्तव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 20 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.

‘इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर ॲप आपल्यावर लादला. आपल्या खाजगी मोबाईलवरून, जमत नसेल तर इतरांना वेठीला धरून तो भरायला भाग पाडले, उच्च न्यायालयाचे आदेश देखील धाब्यावर बसवले. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ केला, धमक्या दिल्या, असेही निवेदनात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा: १५ मार्च रोजी आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा

बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी शुक्रवारी संपावर

एसटी संप काळात मृत्यू झालेल्या १२४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

‘मग दिले तरी काय? तर आश्वासने, आश्वासने आणि फक्त आश्वासनेच! तारीखेवर तारीख, आणि फक्त तारीखच! आता कडेलोट झाला आहे. आपली सहनशक्ती संपली आहे. आपण आता रणशिंग फुंकले आहे. अटीतटीची लढाई लढायला आता आपण सज्ज व्हायचे आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

’20 फेब्रुवारी 2023 पासून आपण बेमुदत संपावर (Strike) जाणार आहोत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद. पोषण ट्रॅकर तर भरणारच नाही, पण अहवाल आणि माहिती पण देणार नाही. आता घरात बसून रहायचे नाही, रस्त्यावर उतरून लढायचे, हा आपला निर्धार आहे, असा निश्चय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी