भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front of Pankaja Munde, headache for Ajit Pawar). त्या अनुषंगाने त्यांनी पुणे परिसरातील विविध मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पण त्यांना फारच वाईट अनुभव आला.
पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात
भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी मोठी नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत सहकार्य करण्याच्या मानसिकतेत भाजपचे कार्यकर्ते नाहीत. माजी आमदार बापू पठारे हे भाजपमधून बंडखोरी करतील, असे चित्र आहे. ते शरद पवार यांना भेटले आहेत. तुतारी हातात घेवून ते आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील, असे दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याची भाजप कार्यकर्त्यांची बिल्कूल मानसिकता नाही.
पवारसाहेबांनी पंकजा मुंडेंना मदतीची भूमिका घेतली होती, पण भाजपने त्यांना डावलले : सुप्रिया सुळे
महापालिका निवडणुका का घेतल्या जात नाहीत. लोकांमध्ये नाराजी आहे. महापालिकेचे अधिकारी जुमानत नाहीत, अशीही नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांची ताकद आता कमी झालेली आहे. त्यांना दीपक केसरकर, तानाजी सावंत यांच्यासारखे कनिष्ठ मंत्री सुद्धा आव्हान देवू लागले आहेत. जनतेमध्ये अजित पवारांना स्थान राहिलेले नाही. अजित पवारांनी तुरूंगात जाणे पसंत करायला हवे होते, पण भाजपसोबत हातमिळवणी करायला नको हवी होती, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे जनतेमध्ये अजित पवारांविषयी प्रचंड मोठी नाराजी आहे.