30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रAnil Gote : देवेंद्र फडणविसांना पाहून सरड्यानेही रंग बदलणे दिले सोडून'

Anil Gote : देवेंद्र फडणविसांना पाहून सरड्यानेही रंग बदलणे दिले सोडून’

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्याच्या कृषी पंपांच्या विज बिलांबाबत केलेले विधान आणि आता सत्तेत असताना केलेले विधान यावरुन राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीस यांना पाहून सरड्याने देखील रंग बदलणे सोडून दिल्याचे गोटे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्याच्या कृषी पंपांच्या विज बिलांबाबत केलेले विधान आणि आता सत्तेत असताना केलेले विधान यावरुन राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीस यांना पाहून सरड्याने देखील रंग बदलणे सोडून दिल्याचे गोटे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या वीज बिलांबाबत ज्या शेतकऱ्यांनी सध्याचे वीज बिल भरले आहे, त्यांची विज जोडणी कापू नये, कालांतराने बिले वसूल करता येतील असे आदेश दिले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांनी सत्तेत नसताना विज बिलांचे पैसे मध्य प्रदेश सरकार प्रमाणे राज्य सरकारने पैसे भरावेत अशा विधानाचे आणि त्यांच्या आताच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट करत शेतकऱ्यांना फडणवीस यांनी दिलासा द्यावा असे ट्विट करत आता असा यु टर्न चालणार नाही असे म्हटले आहे. आमदार गोटे यांनी सुळे यांचे ट्विट रिट्विट केले आहे. तसेच त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका करणारे देखील एक ट्विट केले आहे.

अनिल गोटे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे रंग बदलू राजकारणात दर सहा महिन्या नंतर पैदा होत असल्याने आता सरड्यानेही रंग बदलणे सोडून दिले आहे. संत तुकाराम साडे तिनशे वर्षापूर्वी म्हणाले होते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले! आज म्हणाले असते बोले तैसा न चाले त्यास चेंदावे चांगले”

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांना पिक विम्याचे देखील पैसे मिळाले नाहीत, त्यात आता रब्बी हंगामातील पिकांच्या आशेवर शेतकरी आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपांना वीजेची गरज आहे, मात्र महावितरणने अनेक ठिकाणी वीज जोडण्या तोडण्याची कारवाई सुरू केली होती. याबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी सध्याचे वीज बिल भरले असल्यास वीज जोडण्या तोडू नका असे आदेश महावितरणला देत, कालांतराने वीज बिले वसूल करता येतील असे देखील सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा :

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा : बाळासाहेब थोरात यांचे ‘परफेक्ट मॅनेजमेंट’

Bhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

Ravikant Tupkar: …अन्यथा अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना मध्यप्रदेश सरकारने जसे शेतकऱ्यांच्या विज बिलांचे पैसे भरले तसे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या विज बिलांचे पैसे महावितरणला द्यावेत अशी मागणी त्यावेळी फडणवीस यांनी केली होती. आता फडणवीस यांनी विज बिलांचे पैसे कालांतराने वसूल करता येतील असे म्हटल्यामुळे माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी