32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमहाराष्ट्रAnil Gote : अनिल गोटे म्हणतात, शरद पवार आमचे प्रेरणास्रोत !

Anil Gote : अनिल गोटे म्हणतात, शरद पवार आमचे प्रेरणास्रोत !

साहेब, अखंडपणे काम करीत राहण्याची आपली पद्धत आम्हा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे. आपण लवकर बरे व्हाल, पुन्हा जोराने कामाला लागाल, आम्हाला सतत मार्गदर्शन करीत राहाल!''

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बेत बरी नसताना देखील आज शिर्डी येथे पक्षाच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहीले, यावेळी त्यांनी पक्षाचे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर भाषण देखील दिले. पवारांच्या या भाषणामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. शरद पवार यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अनिल गोटे यांनी ट्विट करत शरद पवार हे आमचे प्रेरणास्त्रोत असल्याचे म्हटले आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ हे शिबिर सुरू आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तब्बेत बरी नसताना देखील उपस्थित राहिले आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार यांना न्युमोनिया झाल्याने ते गेले तीन-चार दिवस मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात उपचार घेत होते. आज शरद पवार आजारी असताना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहीले.
शरद पवार यांच्याबद्दल अनिल गोटे यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, “साहेब, अखंडपणे काम करीत राहण्याची आपली पद्धत आम्हा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे. आपण लवकर बरे व्हाल, पुन्हा जोराने कामाला लागाल, आम्हाला सतत मार्गदर्शन करीत राहाल!”

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Uddhav Thakeray : ‘मध्यवर्ती निवडणूकांसाठी तयार रहा!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरलं

Mumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज?

या शिबिरात बोलताना शरद पवार म्हणाले, तब्बेत बरी नसताना देखील सगळ्यांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी या शिबिराला आलो असे सांगत पक्ष मजबूत करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. मला डॉक्टरांनी दहा-पंधरा दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तरी देखील मी इथे तुमच्यासाठी आलो कारण मला कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असे सांगतानाच ते म्हणाले, आगामी काळात आपला पक्ष वाढवावा लागेल. पुरोगामी विचारांची कास सोडू नका, निवडणुकीसाठी कामाला लगा.

राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी शरद पवार उपस्थित राहणार का अशी आशंका सुरूवातीला कार्यकर्त्यांमध्ये होती, मात्र शरद पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, तुम्ही काम करत रहा असा संदेश आपल्या भाषणातून दिला. पवार यांनी सभागृहात प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पवारांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!