29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रदापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांना दिलासा! मात्र, ईडीकडून आणखी एकाला अटक

दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांना दिलासा! मात्र, ईडीकडून आणखी एकाला अटक

मुंबई उच्चन्यायालयाने अनिल परब यांना दिलासा दिला आहे. गुरुवार 16 मार्चपर्यंत याप्रकरणात अनिल परब यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश उच्चन्यायालयाकडून देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्या विरोधात ईडीने कारवाईचा बडगा उगारला असल्याचे पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे अनिल परब यांचे सहकारी आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना या प्रकरणात ईडीमार्फत अटक देखील करण्यात आली होती. याच पार्ष्वभूमीवर अनिल परब यांनी मुंबई उच्चन्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर मंगळवारी (14 मार्च) रोजी सुनावणी झाली. यावेळी मुंबई उच्चन्यायालयाने अनिल परब यांना दिलासा दिला आहे. गुरुवार 16 मार्चपर्यंत याप्रकरणात अनिल परब यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश उच्चन्यायालयाकडून देण्यात आला आहे.

दुसरीकडे दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीच्या कारवाईचता वेग अगदी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनिल परब यांना उच्चन्यायालयाने दिलासा दिला असता ईडीकडून याप्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे याला ईडीने अटक केली आहे. विशेष म्हणजे दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आत्तापर्यंत ईडीने केलेली ही दुसरी अटक आहे. त्यामुळे सध्या अनिल परब यांना उच्चन्यायालयात दिलासा मिळाला असला तरीही दुसरीकडे त्यांच्यावरील संकट टळले नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

समृद्धी महामार्गावरून 3 महिन्यांत तब्बल 84 कोटींचा टोल वसूल

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर NCPचा राडा

…अन्यथा राज्यभर ‘कुर्सी छोडो आंदोलन’ करू: नाना पटोले

काय आहे प्रकरण?
दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत. दोन भावांमधली कोकणी भावकी सर्वश्रूत आहे. सदानंद कदम राजकारणात फार सक्रिय नाहीत. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार आहेत. सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून साई रिसॉर्टची जमीन 2020 मध्ये विकत घेतली. याच व्यवहारात अफरातफर झाल्याचा ईडीचा आरोप आहे. याबाबतचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सर्वप्रथम करत याप्रकरणात ईडीच्या तपासाची मागणी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी