30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रSafran Project : आता आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राच्या बाहेर

Safran Project : आता आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राच्या बाहेर

महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प बाहेर पडू लागले आहेत. आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्याची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातील मिहान येथून हजारो कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला.

महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प बाहेर पडू लागले आहेत. आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्याची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातील मिहान येथून हजारो कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. आज (रविवार, 30 ऑक्टोबर) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचे भूमिपूजन करत आहेत. दरम्यान, आता फ्रान्सच्या सॅफ्रॉन ग्रुपचा प्रकल्प नागपूर मिहान ते हैदराबादला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राचा डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकास करण्याचे स्वप्न आता भंग पावले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमान आणि रॉकेट बनवणारी सॅफ्रन हि फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी प्रथम नागपुर येथील मिहानमध्ये येण्यास इच्छुक होती. यामध्ये एक हजार 185 कोटींची गुंतवणूक होणार आहे. परंतु आता राज्य सरकारने केलेल्या दिरंगाईमुळे सॅफ्रन ही कंपनी आता हैदराबाद येथे स्थलांतरित होणार आहे.

महाराष्ट्रात सरकारच्या दिरंगाईमुळे प्रकल्प गेला?
या प्रकल्पासाठी जागा घेण्यासाठी सॅफ्रन ग्रुपने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी (एमएडीसी) संपर्क साधला होता. परंतु या प्रकल्पासाठी जागा मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याचे आता बोलले जात आहे. यानंतर, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सॅफ्रन ग्रुपचे सीईओ ऑलिव्हियर अँड्रेस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रात या प्रककल्पासाठी जागा मिळत नसल्याने हा प्रकल्प हैदराबाद येथे स्थलांतरित होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Rishab Shetty : ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायकचे दर्शन

Aadhar Card Pan Card Link : 31 मार्च पूर्वी ‘हे’ काम करून घ्या अन्यथा पॅन कार्ड उपयोगाचे राहणार नाही!

Kishori Pednekar : किरीट सोमय्यांनी सात दिवसात आरोप सिद्ध करून दाखवावे : किशोरी पेडणेकर

नागपूर येथील मिहानमध्ये टाटा फ्लोअर बीम, रिलायन्स-डसॉल्ट फाल्कनसाठी उपकरणे तयार करण्याशी संबंधित कंपनी सध्यस्थितीत कार्यरत आहे. एअर इंडिया आणि इंदमार या दोन्ही कंपन्या एमआरओ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करत आहेत. या चार युनिट्सव्यतिरिक्त गेल्या काही वर्षांपासून डिफेन्स एव्हिएशनशी संबंधित एकही मोठी कंपनी अद्यापही आलेली नाही. तर येथे येऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना जागा मिळत नाही, जागा मिळत असेल तर अ‍ॅप्रोच रोडच्या अडचणी येत आहेत, अशा विविध समस्या येत आहेत.

हाच प्रकल्प महाराष्ट्राने गमावला
भारतातील आणि जगातील इतर देशांतील व्यावसायिक कंपन्या Lip-1A आणि Lip-1B इंजिन वापरतात. त्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या एमआरओ प्रकल्पात केले जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 185 कोटींची परदेशी गुंतवणूक होणार आहे. या MRO मुळे 500-600 अत्यंत कुशल कामगारांची गरज भासेल. पहिल्या टप्प्यात, या एमआरओमध्ये वर्षभरात 250 लोकोमोटिव्हची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची क्षमता असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी