33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपत्रकार अरुण जावळे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर

पत्रकार अरुण जावळे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर

‘मराठा क्रांती मोर्चा आणि क्रांती’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक पत्रकार अरुण जावळे यांना पत्रकारितेतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांची लेखनाची शैली, त्यातील शब्दरचना आणि शब्दसौंदर्य याचे जणू देणगी त्यांना लाभली आहे. पत्रकार पलिकडे त्यांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, उत्तम वक्ता म्हणून प्रत्येक सातारकरांना अरुण जावळेंचा विशेष अभिमान आहे. नुकतेच अरूण जावळे यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेल्या जावळेकरांना कसलाही अहंकार नाही किंवा कोणाबद्दल द्वेषभावना नाही. उलट सर्वांच्या प्रती मैत्रीभाव जपत मित्रांबद्दल भरभरून व मुक्तपणे लिहित असतात. मराठा मोर्चावरील ‘मराठा क्रांती मोर्चा आणि क्रांती’ हे महाराष्ट्रातील  सर्वात पहिले प्रसिध्द  झालेले त्यांचे पुस्तक आहे. त्यांची इतर पुस्तकेही महत्त्वपूर्ण आहेत.

सातारा येथे ज्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण घेतले तेथील शाळा प्रवेश दिन जगासमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. अथक प्रयत्नांनतर अखेर राज्याने त्यांच्या कार्याची दखल घेतली. राष्ट्रपतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन देशभर व्हावा यासाठी अनुमोदन दिले. एक पत्रकार निष्ठेने काम करु लागला, तर काय होऊ शकते हेच अरुण जावळे यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. अरुण जावळे यांना जाहीर झालेल्या युवा साहित्य पुरस्काराबद्दल त्यांचे विशेष आभार. यापुढे त्यांनी असेच लिहित रहावे, पत्रकारितेबरोबर सामाजिक क्षेत्र देखील गाजवत रहावे, यासाठी त्यांना ‘लय भारी’च्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा!

हे सुद्धा वाचा : 

मुख्यमंत्री साहेबांनी काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अजितदादांमुळेच मी..; त्या विधानानंतर अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

खारघर- तुर्भे लिंक रोड तीन वर्षांत पूर्ण होणार

journalist Arun Jawale, Arun Jawale, Youth literature award, Arun Jawale honored as Youth literature award

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी