32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रTerrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या

Terrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या

भारतातील दिल्ली आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ही राज्ये दहशवाद्याच्या निशाणावर आहेत. कारण पुण्यातून अटक केलेल्या जुनैदने हे कबूल केले आहे. तो निघण्याच्या तयारीमध्ये असतांना त्याला पोलिसांनी अटक केली. आचार्य संदीप, जितेंद्र रिझवी हे देखील दहशवाद्यांच्या निशाणावर होते.

भारताची सुरक्षा धोक्यात असल्याचे संकेत या महिन्यात एटीएसने केलेल्या कारवायांमुळे अधोरेखीत झाले आहे. एटीएसने पुण्यातील दापोडी येथून एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद जुनेद असे या दहशवादी संघटनेमध्ये सहभागी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील लोकांच्या संपर्कात होता. त्याला पाकिस्तानमधून फोन येत होते. तसेच त्याच्या खात्यावर पाकिस्तानमधून पैसे आल्याचे त्यांनी तपासात कबूल केले आहे.

भारतातील दिल्ली आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ही राज्ये दहशवाद्याच्या निशाणावर आहेत. कारण पुण्यातून अटक केलेल्या जुनैदने हे कबूल केले आहे. तो निघण्याच्या तयारीमध्ये असतांना त्याला पोलिसांनी अटक केली. आचार्य संदीप, जितेंद्र रिझवी हे देखील दहशवाद्यांच्या निशाणावर होते. आचार्य संदीप हे नेहमी मुस्ल‍िम धर्माच्या विरुद्ध बोलायचे. तसेच जितेंद्र नारायण हे देखील दहशतवाद्यांच्या निशाणावर होते. त्यांनी हिंदू धर्म स्विकारला होता. त्यांचे पूर्वीचे नाव हे वसीम र‍िझवी असे होते. तसेच स्वामी नरेंद्र हे देखील निशाणावर होते.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

Asia Cup 2022 : ‘या’ दोन खेळाडूंची आशिया कप खेळण्याची संधी हुकणार

Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?

काही द‍िवसांपूर्वी जम्मू काश्मिर मधून दहशवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईमधील काही पंचतारांकित हॉटेलना देखील निनावी ईमेल आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या विरारमधून एका संशय‍िताला अटक केली होती. तर रशियामध्ये Is च्या दहशवाद्याला अटक केली होती. तो भारतात हल्ले करण्यासाठी येणार होता. तो सुसाईड बॉम्बर असल्याचे रशियाच्या सुरक्षा एजन्सीने सांगितले आहे. तर आठ दिवसांपूर्वी रायगडमधील हर‍िहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक बोट सापडली आहे. तिच्यामध्ये स्फोटके तसेच एके – 47 रायफल सापडल्या आहेत. त्या बोटीवरची माणसे मात्र बेपत्ता आहेत. ती बोट ऑस्ट्रलियन महिलेची आहे. ही  माहिती राज्याचे नवे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यांनी हे प्रकरण अत्यंत हलक्यात घेतलेले दिसत आहे. त्यामुळे महराष्ट्रात दहशवादी कारवायांची पाळंमुळे खोलवर रुजलेली आहेत. महाराष्ट्राला 40 दिवस मंत्रीमंडळ नव्हते. महाराष्ट्राची सुरक्षा राम भरोसे होती. त्याचा फायदा दहशवादी संघटना घेत आहेत. मागच्या आठवडयात मुंबई पोलिसांना दहशवादी हल्ला होणार असल्याचा मॅसेज आला होता. त्यामध्ये त्यांनी हे हल्ले करणारे भारतातील लोक असतील असेही सांगितले होते. त्यांच्या या धमकीला सरकारने गांभीर्यांने घेतलेले दिसत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी