31 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमहाराष्ट्रमोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले असताना राजकीय नेत्यांवरील हल्ल्यांचे प्रकारही वाढत चालले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ते शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Attack on Sandip Deshpande)

आक्रमक शैलीत आपले राजकीय मुद्दे मांडणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना र्वरित हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असायचे समजते. त्यांच्यावर नेमका कोणत्या कारणास्तव हल्ला करण्यात आला याबाबत पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोरांचाही शोध घेण्यात येत आहे.

या हल्ल्याबाबत संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हंटले आहे की, यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे. या असल्या हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही.

हे सुद्धा वाचा

TAIT Exam : परीक्षेपासून वंचित ठेवलेल्या विवाहित महिला उमेदवाराला परीक्षा देता येणार; उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश

फडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’!

रविंद्र धंगेकरांसाठी ‘कामाचा माणूस’ ही ओळख त्यांच्या विजयासाठी मोठा फॅक्टर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी