33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली...

मोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली मंजुरी !

औरंगाबाद आणि उस्मानाबद शहरांच्या नामांतराला आज केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव आता धाराशिव असणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताबदलापूर्वी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही शहरांच्या नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी दिली होती. त्यानंतर मविआ सरकार पडल्यानंतर शिंद-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तो निर्णय अल्पमतात घेतल्याचे म्हणत रद्द केला. त्यानंतर मात्र पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने त्यात थोडी दुरुस्ती करत संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करत पुन्हा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. (Aurangabad’s Chhatrapati Sambhajinagar and Osmanabad’s Dharashiv Central Govt approves renaming)

सन १९९९ साली युती सरकारच्या काळात दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर गेली कित्तेक वर्षे हा प्रस्ताव मार्गी लागलेला नव्हता. सन २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षे कालखंड लोटत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ४० आमदार आपल्यासोबत घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. मात्र उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळण्याआधी मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरेंचा निर्णय अल्पमतातील सरकारने घेतलेला निर्णय ठरवत तो रद्द केला. मात्र त्यावर टीका होऊ लागल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने नामांतरामध्ये थोडा बदल करत संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असा नामांतराचा प्रस्ताव मंजूर करत तो केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला होता. याच सोबत त्या बैठकीत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता.
आज केंद्र सरकारने नामांतराला मंजूरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरव्दारे नामांतराची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी… औरंगाबादचे छत्रपतीसंभाजीनगर. उस्मानाबादचे धाराशिव… मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांचे मनःपूर्वक आभार…


तर उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी