33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रAzadi ka Amrit Mahotsav : धनंजय मुंडे - डॉ. प्रीतम मुंडे येणार...

Azadi ka Amrit Mahotsav : धनंजय मुंडे – डॉ. प्रीतम मुंडे येणार एकत्र!

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण शनिवारी सकाळी 10. 30 वा धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अतिविशाल तिरंगा ध्वजाची उंची तब्बल 150 फूट इतकी असून त्याच्यासोबत एल इ डी स्पॉट लाईट, जनरेटर, सीसीटीव्ही, सेफ्टी वॉल कंपाउंड तसेच सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. 

देशभरातून मोठ्या उत्साहात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुद्धा या सोहळ्याची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्याचा संकल्प घेत अनेक जण नाविण्यपूर्ण वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून नागरी दलितेत्तर योजनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेजवरील डोंगरावर अतिविशाल तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्थळ साकारण्यात आले आहे. याप्रसंगी भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे राजकारणातील प्रचंड वादावादीनंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे एकत्र दिसणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण शनिवारी सकाळी 10. 30 वा धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अतिविशाल तिरंगा ध्वजाची उंची तब्बल 150 फूट इतकी असून त्याच्यासोबत एल इ डी स्पॉट लाईट, जनरेटर, सीसीटीव्ही, सेफ्टी वॉल कंपाउंड तसेच सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. याप्रसंगी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यासह बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

VIDEO : नेरूळमध्ये ‘तिरंगा रॅली’

MLA Anil Babar wife : आमदार पत्नीचे निधन, कुटुंबियांनी घालून दिला आगळावेगळा आदर्श

VIDEO : रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी काढला चाकू

मराठवाड्यात सर्वात उंच असणाऱ्या या विशाल तिरंगा ध्वजासाठी व त्याच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 82 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या उंच डोंगरावर हा तिरंगा ध्वज डौलाने फडकणार असून दूर अंतरावरून सुद्धा हा ध्वज लक्ष वेधून घेणार आहे. या ध्वजासह सेल्फी पॉईंटचे सुद्धा लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असून, या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुंदर बोंदर यांनी केले आहे. दरम्यान, या प्रसंगी धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची एकत्रित उपस्थिती सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी