29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रAzadi ka Amrit Mahotsav: सैनिकांना तिरंगा राखी पाठवा, सरकारचे आवाहन

Azadi ka Amrit Mahotsav: सैनिकांना तिरंगा राखी पाठवा, सरकारचे आवाहन

देशभक्तीचा आणि भारतीय संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ असणारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील भगिनींनी राबवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या अनोख्या पद्धतीने यंदा राखीचा सण साजरा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

देशभरातून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक राज्य काहीतरी नाविण्यपुर्ण कार्यक्रम घेऊन येत नागरिकांना सुद्धा त्यात सामील करून घेत आहे. महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून सीमेवरील तैनात सैनिकांना डिजिटल तिरंगा राखी पाठवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाकडून करण्यात आले आहे. स्वराज्य महोत्सवाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच दि. 11 ऑगस्ट रोजी, रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून डिजिटल तिरंगा राखी सीमेवरील अहोरात्र पहारा देणाऱ्या बांधवांना पाठवता येतील असे या विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या उपक्रमात कोणाला भाग घ्यायचे असल्यास सांस्कृतिक कार्य विभागाच्या mahaamrut. org या संकेतस्थळावरील मुखपृष्ठावर “डिजिटल राखी” यावर क्लिक करा, तुमची राखी तात्काळ इच्छित स्थळी सैनिकांपर्यंत पोहोचेल. सीमेवरील सैनिकांसाठी, महाराष्ट्रातील महिला भगिनींकडे “डिजिटल तिरंगा राखी” अशा फाॅर्मचा सुद्धा पर्याय आहे.

संबंधित संकेतस्थळावरील डिजिटल राखी येथे क्लिक केल्यास तिथे तुम्हाला एक अर्ज दिसेल. त्या अर्जात स्वतःचे नाव, गावचे नाव, मोबाईल नंबर आणि डिजिटल तिरंगा राखी असे पाठवायचे आहे, अशा प्रकारे प्राप्त झालेल्या डिजिटल तिरंगा राख्या सीमेवरील सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

P L Academy Problem : पु. ल. देशपांडे अकादमीत पिण्याच्या पाण्याचा नळ नाही, तरीही लाखोंची बिले!

Eknath Shinde Cabinet decision: शिंदे सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना दुप्पट मदत; ‘मेट्रो ३’चा खर्च ३३ हजार कोटी!

Sanjay Rathod : संजय राठोडांनी चित्रा वाघ यांना ठणकावले, परत बोलाल तर…

दरम्यान, देशभक्तीचा आणि भारतीय संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ असणारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात महाराष्ट्रातील भगिनींनी राबवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या अनोख्या पद्धतीने यंदा राखीचा सण साजरा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी