24 C
Mumbai
Monday, January 23, 2023
घरमहाराष्ट्रPHOTO : चैत्यभूमीवर देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांचा महासागर लोटला

PHOTO : चैत्यभूमीवर देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांचा महासागर लोटला

हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून दलितांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आज दादर चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा अलोट जनसागर लोटला होता.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून दलितांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आज दादर चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा अलोट जनसागर लोटला होता. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला होता. यंदा लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आले होते.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

शिवाजी पार्क येथे देखील मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. शिवाजी पार्क येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आंबेडकरी अनुयायी.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती. महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना अनुयायी.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi महापरिनिर्वाणदिनानिमित्त येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी अनेक संस्था संघटना अन्नदान करत असतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून भोजन घेताना आंबेडकरी अनुयायी.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आलेले बौद्ध भिक्खू आणि भन्ते भीम ज्योतीला नमन करताना.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

महापरिनिर्वाणदिनासाठी देशभरातून चैत्यभूमीवर आलेले श्रामणेर हातात फलक घेऊन शांतीचा तसेच आंबेडकारांचे विविध संदेश देताना.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक फुलांनी सजविलेले स्मारक.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomiभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास आणि कार्यांचे फोटो प्रदर्शन भरविण्यात आले होते. पोलीस दलातील एका कर्मचारी बाबासाहेबांच्या जीवनप्रवासातील काही क्षणचित्रे कॅमेराब्ध करताना.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

चैत्यभूमीकडे येताना रस्त्यावर आबेंडकरी अनुयायांची लागलेली भलीमोठी रांग.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले अनुयायी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून मार्गक्रमण करताना.

Babasaheb Ambedkar's death anniversary at Chaityabhoomi

बाबासाहेबांच्या ओढीने चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांच्या विश्रांतीकरिता मंडप उभारण्यात आले असून. मंडपात विसावलेले अनुयायी.

हे सुद्धा वाचा
राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!