21 C
Mumbai
Thursday, January 26, 2023
घरमहाराष्ट्र'शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे'

‘शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे’

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसंदर्भात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, अतिवृष्टीने यावर्षी शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले ही वस्तुस्थिती आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. पीकविमा (crop insurance) कंपन्यांकडून व राज्य सरकारकडूनही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण १०० रुपये, १२८ रुपयांचा धानदेश पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला दिला ही लाजीरवाणी बाब आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारच्या वतीने व पीकविमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु पीकवीमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना १०० रुपये, १२८ रुपयांचे धनादेश मिळाले आहेत, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून विमा कंपन्या व राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याला तातडीने मदत मिळेल हे सुत्र सरकार ठेवणार का ? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा
…इतर कुणाची ती पात्रता नाही; नाना पटोले यांचा सणसणीत टोला

‘ठाकरे सरकारने बिल्डर, बार, दारुवाल्यांना दिलेल्या सवलतीची चौकशी करा’

मोदी-शाहांचे खासमखास, गुजरात दणदणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या निवडणुकीत पराभव

विमा कंपन्या नफेखोर झाल्या आहेत. आमचे सरकार असताना आम्हीही त्यासंदर्भात प्रयत्न केला. कृषी मंत्री म्हणतात एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा धनादेश येणार नाही पण एक हजार हे काय शेतकऱ्याच्या मालाचे मोल आहे का? एनडीआरएफचे निकष वाढले असल्याचे सरकारने सांगितले तसे असेल तर चांगलेच आहे. संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहणार का? आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारचे काय सुत्र आहे ? असा प्रश्न थोरात यांनी विचारला.

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरोधी पक्षांनी  पीकविमा कंपन्यांविरोधात विरोधी पक्ष आवाज उठवत आहेत. मात्र पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना अत्यंत तोकडी रक्कम देत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत निदर्शनास आणून दिले. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार का असा सवाल देखील केला.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!