30 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब थोरातांच्या कन्येने विखे पाटलांना सुनावले

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने विखे पाटलांना सुनावले

मनमाड रस्ता ही त्यांची निष्क्रियतेची मोठी ओळख असल्याची टीका युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्री थोरात यांनी केली आहे. (Balasaheb Thorat's daughter Jayashree Thorat slams Vikhe Patal)

संगमनेर तालुका उभा राहण्यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मोलाचा वाटा आहे. मात्र, आता याच तालुकामधील तरुण पिढीला चुकीच्या वाटयाला लावणाऱ्या लोकांना थोरात यांची कन्या आणि युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्री थोरात यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. संगमनेर येथील सहकार शिक्षण समाजकारण हे सर्वांसाठीच आदर्शवत आहे. मात्र, आता तालुक्याचे वाईट करण्यासाठी काही लोक तरुणांची डोके भडकवण्यासाठी बाहेरून येऊन भाषण करत आहेत. पण, अशा लोकांच्या भाषणातून फक्त दादागिरी आणि दडपशाही याची की जाणीव होते. (Balasaheb Thorat’s daughter Jayashree Thorat slams Vikhe Patal)

महसूल अधिकारी हेच राज्य नागरी सेवेचे अधिकारी: उच्च न्यायालय

हा संगमनेर तालुका असून दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी सहन सुद्धा करत नाही असे सांगताना नगर मनमाड रस्ता ही त्यांची निष्क्रियतेची मोठी ओळख असल्याची टीका युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्री थोरात यांनी केली आहे. (Balasaheb Thorat’s daughter Jayashree Thorat slams Vikhe Patal)

डॉ जयश्री थोरात या चिखली ,धांदरफळ, वडगाव लांडगा, जवळेकडलग, राजापूर येथे झालेल्या युवा संवाद यात्रेत बोलत होत्या. यावेळी समवेत मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, विष्णुपंत रहाटळ, विनोद हासे, श्रीराम पवार, दत्तू कोकणे, आनंद वर्पे बाळासाहेब कानवडे, प्रदीप हासे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व गावांमध्ये या युवा संवाद यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत झाले. 

मूरघास आणि मुक्तगोठा ही संकल्पना म्हणजे आधुनिक क्रांती: रणजितसिंह देशमुख

याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असलेला तालुका आहे. मोठ्या कष्टातून हा तालुका उभा राहिला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली इथला सहकार शिक्षण ग्रामीण विकास ही राज्यासाठी आदर्शवत आहे. (Balasaheb Thorat’s daughter Jayashree Thorat slams Vikhe Patal)

सुसंस्कृत राजकारण हे संगमनेर तालुक्याची वैशिष्ट्य आहे. तरुणांची चांगली पिढी घडवण्यासाठी काम केले जात आहे. मात्र बाहेरून येणारे लोक येथे माथी भडकवत आहेत. दादागिरी आणि दडपशाही काय असते त्यांच्या भाषणातून कळत आहे. नगर दक्षिणेमधून त्यांना पराभूत व्हावे लागले ते निष्क्रियतेमुळेच गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता हे निष्क्रियतेचे मोठे उदाहरण आहे. 

राहता तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अडचणीत आहे. ज्यांनी अनेक संस्था बंद पाडल्या ते आता विकासाच्या गप्पा करत आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले ज्यांनी या कामात अडचणी निर्माण केल्या ते या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहे. मात्र जनता यांना ओळखून आहे.

आपल्याला संस्कृत राजकारणाची परंपरा जपत पुढे जायचे आहे. तरुणांना भडकवून जातीभेद करून दादागिरी निर्माण करू पाहणाऱ्यांना सर्वांनी वेळीच रोखायचे आहे. 

कुणी एक मारली तर दोन मारा हे हे सांगणे म्हणजे आपण कुठल्या लोकांचे भाषण ऐकत आहोत असा प्रश्न जनतेला पडला आहे. कारण असे हाणामारी आणि दडपशाहीचे राजकारण संगमनेर तालुक्याला माहीत नाही. त्यांचे राजकारण दोन चार भाषणांवरून जनतेला कळले आहे आणि एक महिन्यानंतर ही पुन्हा कोणाला दिसणारे नाही अशी टीका डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.

रामहरी कातोरे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. संगमनेर तालुका हा कायम काँग्रेसच्या विचाराचा राहिला आणि भक्कमपणे एकवटला आहे. ज्यावेळेस तालुक्याची अस्मिता डिचवली जाते. त्यावेळेस तालुका एकवटून लढा देतो हे आपले वैशिष्ट्य आहे. तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आणि अस्मितेसाठी आता सर्वांनी एकजुटीने लढा असे आवाहन केले. यावेळी विविध गावांमधून डॉ. जयश्री थोरात आणि युवा संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी