30 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमहाराष्ट्ररक्षाबंधनाच्या सणानिमित्त थोरात, तांबे कुटुंबिय एकत्र

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त थोरात, तांबे कुटुंबिय एकत्र

देशभरात आज रक्षाबंधनाचा सन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेत आशीर्वाद दिले. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरोत यांनी देखील बहिण संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्याकडून राखी बांधून घेतली. तसेच बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री यांनी छोटा भाऊ राजवर्धनला राखी बांधली.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गाताई तांबे या दरवर्षी बंधू बाळासाहेब थोरात यांना राखी बांधतात. या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येते. राजकारणाच्या रोजच्या धावपळीत सणासुदीच्या निमित्ताने वेळातवेळ काढून तांबे आणि थोरात कुटुंब आज एकत्र आले. यावेळी डॉ सुधीर तांबे, बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात देखील उपस्थित होते. दुर्गाताई तांबे यांनी बाळासाहेब थोरातांना ओवाळून राखी बांधली.


बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी देखील आपला छोटा भाऊ राजवर्धन याला राखी बांधली. रक्षाबंधनाचा हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला असून बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त लाडका छोटा भाऊ राजवर्धनला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले, असे कॅप्शन दिले आहे.

हे सुद्धा वाचा 
योगी आदित्यनाथ यांना रक्षाबंधनानिमित्त मुलींनी बांधली राखी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या सौभाग्यवतीने धरला मंगळागौरचा फेर !
शरद पवारांच्या ओठात काय, पोटात काय?; इंडियाच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष

थोरात कुटुंबात हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साजरा झाला. राजकीय जीवनात रोजची धावपळ असते, लोकांसाठी पहाटेपासून वेळ द्यावा लागतो. अनेकदा कुटुंबियांना वेळ देखील देता येत नाही. मात्र राजकीय जीवनात सणावाराचे निमित्त साधून कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढत दोन घटका आपुलकीच्या गप्पागोष्टी करता येतात. आज थोरात कुटुंबियांनी देखील रक्षाबंधनानिमित्त कौटुंबिक जिव्हाळा जपला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी