30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रखुशखबर ! आता दिवसा मिळणार शेतीला पाणी

खुशखबर ! आता दिवसा मिळणार शेतीला पाणी

टीम लय भारी

मुंबईः अनेक वर्षांपासून दिवसा शेतीला पाणी मिळावे अशी बळीराजाची मागणी होती. ती आता पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज बैठक झाल्याचे माध्यमांना सांगितले. 2018 साली घोषीत केलेली मुख्यमंत्री सौर कृषी योजना पुन्हा एकदा ‘फास्ट टॅक’वर आणार असल्याचे या बैठकीत निश्चित झाले आहे. ही योजना 1 वर्षांत राज्याच्या विविध भागात सुरु होईल. ही बातमी बळीराजासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंद देणारी आहे. 2018 मध्ये 200 मेगावॅटचे काम सुरु केले होते. हे काम थांबले होते.

 काही गावांमध्ये वीज बिल न भरल्यामुळे लाईट बंद आहेत. रस्त्यावरचे दिवे बंद आहेत. वीज बिल न भरल्यामुळे कृषी पंपाचे कनेक्शन कापण्यात आले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी या योजनेला पुन्हा नव्याने उभारी देण्याचे काम नवीन सरकार करणार आहे. जूनी थकबाकी महावितरण आणि राज्य सरकारने भरावी. त्यानंतर गावांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून दयावे असा निर्णय आजच्या बैठकीत झाला.

ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. दिवसा वीज नसते. रात्री सिंगल फेज वीज मिळते. त्यामुळे शेतीला पाणी देण्यास अडचण निर्माण होते. शेतकरी रात्रीच्या वेळी शेतशिवारात जावून पिकांना पाणी देतो. हे सर्व करतांना खूप त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी विंचू, साप, कोल्हे, लांडगे यांची भीती असते. अनेक वेळा बिबटे, तरस माणसांवर हल्ला करतात. त्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.

विशेषतः उसाच्या मळयात रात्रीच्या वेळी पाणी दिले जाते. अनेक पिकांना रात्रीच्या वेळी पाणी दयावे लागते. काही वर्षांपासून शेतशिवार हे हिंस्त्र प्राण्यांचे वस्तीस्थान बनले आहे. त्यामुळे दिवसा वीज मिळाली, तर बळीराजा नक्कीच सुखावणार आहे.

हे सुध्दा वाचा:

राज्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता

VIDEO : बीएमसीच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची पावसाने दिली पोचपावती

गुरूपोर्णिमेसाठी गुलाब खरेदी करताय? मग ‘हे’ वाचायलाच हवे

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!