30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्र'बार्टी'च्या महिला अधिकाऱ्याविरोधात मुंडण आंदोलन करुन संताप व्यक्त

‘बार्टी’च्या महिला अधिकाऱ्याविरोधात मुंडण आंदोलन करुन संताप व्यक्त

राज्यातील दलित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था ( बार्टी) स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना फायदाही झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षात या संस्थेला गैरव्यवहाराची वाळवी लागली आहे. याला या संस्थेतील निबंधक इंदिरा अस्वार जबाबदार असून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी गौतम भंडारे आणि कविता गाडगे यांनी मुंडण आंदोलन केले. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला राज्यस्तरातून अनेकांनी पाठिंबा दिला असून कार्यवाही न करणाऱ्या सरकारच्या विरोधात रोष दिसून येत आहे.

बार्टीतील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले असून त्याविरोधात गौतम भंडारे, तक्षशिला महिला मंडळाच्या कविता गाडगे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या वर्षभरापासून ते आंदोलन करीत असून अधिवेशनामध्ये त्यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यांनी येथील निबंधक अस्वार यांच्या विभागीय चौकशीला तत्काळ मंजुरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आंदोलन आत्मदहन आंदोलन करण्यात येणार होते.

त्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत गौतम भंडारे, कविता गाडगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची बैठक बार्टीच्या पुणे येथील कार्यालयात घेतली होती. तसेच चौकशीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा 
जवानचा सिक्वेल येणार… ‘या’ अभिनेत्याने दिली माहिती
मनसेचे आमदार राजू पाटील संतापले, नावापुढे डॉक्टर लावणाऱ्या आयुक्त, खासदारांना लोकांची नस सापडली नाही!
कोरोना काळात नोकरी गेली, उपासमारीची वेळ आली; पण बाप्पाने चिंता मिटवली

मात्र, बार्टीचे महासंचालकांनी दिलेले आश्वासन फुसके ठरल्याने ११ सप्टेंबरला मुंडण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून सामाजिक न्याय समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर मोटघरे, आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर नंदागवळी, पुंडलिक घ्यार यांच्यासह शेकडो संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी