32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसावध राहा... खासदार नवनीत राणा यांना आले धोक्याची सूचना देणारे पत्र

सावध राहा… खासदार नवनीत राणा यांना आले धोक्याची सूचना देणारे पत्र

टीम लय भारी

अमरावती : महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना त्यांची जर कोणी दमछाक केली असेल तर त्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana) होत्या. खासदार नवनीत राणा यांनी मविआ सरकारला भांबावून सोडले होते. हनुमान चालीसा चा मुद्दा तर इतका तापला की, राणा दाम्पत्याला अटक सुद्धा करण्यात आली. त्यावेळी त्यांना अनेकांकडून धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. पण आता नवनीत राणा यांना सावध राहण्याचे एक पत्र (Be careful… MP Navneet Rana received a letter alerting him to the danger) आले आहे. त्यांच्या मागावर काही लोक असल्याचे या पत्रामधून त्यांना सांगण्यात आले आहे.

नवनीत राणा यांना पाठविण्यात आलेले पत्र हे एका मुस्लिम व्यक्तीकडून पाठविण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने हे पत्र पाठवले ती व्यक्ती सरकारी कर्मचारी असल्याचे त्याने स्वतः या पत्रात नमूद केले आहे. काही व्यक्ती राजस्थान बॉर्डरच्या मार्गाने अमरावती येथे दाखल झाले आहेत. ते व्यक्ती नवनीत राणा यांच्या मागावर आहेत. तसेच ते त्यांच्या घरी देखील जाऊन आल्याचे त्यांनी या पत्रामधून नवनीत राणा यांना सांगितले आहे.

सावध राहा... खासदार नवनीत राणा यांना आले धोक्याची सूचना देणारे पत्र

नवनीत राणा यांनी सदर व्यक्तीला अनेकवेळा मदत केली आहे. तसेच या व्यक्तीची बदली देखील नवनीत राणा यांनी केली. इतकेच नव्हे तर या व्यक्तीच्या वडिलांना कोरोना काळात सुद्धा नवनीत राणा यांनी मदत केली होती. म्हणून या व्यक्तीला नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळताच त्यांनी पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना सावध राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, याआधी सुद्धा हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून एका मुस्लिम धर्मगुरूकडून नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. याबाबतची तक्रार नवनीत राणा यांनी पोलिसांत केली होती.

हे सुद्धा वाचा :

शिवसेनेची गळती थांबेना, शिंदे गटात अर्जुन खोतकर सामील होणार?

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

खासदार भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला शिवसेनेत प्रवेश

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी