भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी सरकारचा दुरूपयोग करून मायणी येथे ईडीची धाड टाकायला लावली होती(Because of Jayakumar Gore, 10 women of Mayani cursed the government). त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी १० निष्पाप महिलांना कोंडून ठेवले होते. काळाचा महिमा बघा, आज मात्र महिलांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर मोर्चा काढला.
जयकुमार गोरे म्हणतात, आम्ही विरोधकांना तुरूंगात टाकू; विरोधकांनीही दिले खणखणीत उत्तर !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माण – खटावचे नेते अनिल देसाई आज लय भारीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर खरमरीत टीका केली. जयकुमार गोरे यांना हद्दपार करणे ही नितांत गरज आहे. मी, प्रभाकर देशमुख व अभय जगताप आम्हा तिघांपैकी एकजणच कुणीतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकच उमेदवार असेल. जयकुमार गोरे हे तीन महिन्यांनंतर आमदार नसतील, असाही दावा त्यांनी यावेळी केला.
Jaykumar Gore | जलनायक नव्हे, खलनायक | खटाव तालुक्यावर अन्याय | Devendra Fadanvis