31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमहाराष्ट्रबीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजातील उपोषणकर्त्या वृद्धाचा थंडीने कडकडून मृत्यू; गेंड्याच्या कातडीच्या...

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजातील उपोषणकर्त्या वृद्धाचा थंडीने कडकडून मृत्यू; गेंड्याच्या कातडीच्या बेपर्वा प्रशासनाने बळी घेतल्याचा कुटुंबाचा आरोप

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वासनावाडी येथील पारधी समाजाचे वृद्ध आप्पाराव भुजाराव पवार (वय 60) यांचा रविवारी (दि.4) थंडीने कडकडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा आणि गेंड्याच्या कातडीचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हक्काच्या घरकुलाचे उरलेले हप्ते मिळावेत, या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या वासनावाडी येथील पारधी समाजाचे वृद्ध आप्पाराव भुजाराव पवार (वय 60) यांचा रविवारी (दि.4) थंडीने कडकडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा आणि गेंड्याच्या कातडीचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या वृद्ध उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी वृद्ध आप्पाराव पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूची चौकशी होणे आता गरजेचे असल्याही मागणी होत आहे. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी पवार हे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते. मात्र, या उपोषनकर्त्याची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. दरम्यान, पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैदु र्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वासनवाडी येथील आप्पाराव पवार, गणेश पवार, बाबाराव पवार तसेच अन्य एका कुटुंबासाठी शबरी योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलांच्या बांधणीसाठी 15 हजारांचे दोन हप्ते देखील मिळाले. या कुटुंबाकडे जागेचा पीटीआर असताना देखील गावचे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून घरकुलासाठी विरोध होत असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे. घरकुल बांधुन मिळावे यासाठी ही कुटुंबे गेली दोन वर्षे शासन दरबारी पाठपूरावा करत होते. मात्र प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने आज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे एका व्यक्तीचा बळी गेला.

हे सुद्धा वाचा
एकाच वेळी 400 पदाधिकाऱ्यांनी ‘राज ठाकरें’ना केला अखेरचा जय महाराष्ट्र !
गुजरात जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय, संजय राऊतांचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल !

रविवारी अप्पाराव पवार यांच्या मृत्यूनंतर शासकीय अधिकारी तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांध्ये संतापाची तीव्र लाट पसरली असन जिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी देखील नागरिकांमधून केली जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!