31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does not get money). आपण माण – खटावचा विकास केलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, असं जयकुमार गोरे सतत बोलत असतात. त्या अनुषंगाने लय भारीचे संपादक तुषार खरात वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहेत. तेथील जनतेसोबत संवाद साधत आहेत.

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does not get money). आपण माण – खटावचा विकास केलेला आहे. त्यामुळं विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, असं जयकुमार गोरे सतत बोलत असतात. त्या अनुषंगाने लय भारीचे संपादक तुषार खरात वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत आहेत. तेथील जनतेसोबत संवाद साधत आहेत.

Shahajibapu Patil | Jaykumar Gore | जयकुमार गोरेंचे नाव घेताच शहाजीबापू पाटलांचे समर्थक खवळले

जयकुमार गोरे यांनी खरंच विकास केला आहे, का याबाबत सामान्य लोकांशी संवाद साधत आहे. मायणी येथील बाजारात जावून तुषार खरात यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. एका महिला शेतकऱ्यांशी बोलत असताना त्यांनी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच बोलत नाही, असं सांगितलं. आम्हाला १५०० रूपयांची गरज नाही. आम्हाला आमच्या शेतमालाला हक्काचा भाव द्या, असं या शेतकरी महिलनं सांगितलं. आमचं गाव एनकूळ आहे. एनकूळमध्ये कॅनॉल आलेला नाही. त्यामुळं उन्हाळ्यात पाणी नसतं. माझी मुलं आमदार जयकुमार गोरे यांचेच कार्यकर्ते आहेत. जयकुमार गोरे गावात येतात. गावटग्यांना भेटतात. मोठमोठ्या माणसांना भेटतात. पण गरीब शेतकऱ्यांना कोणी भेटत नाही,

आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं भाजप सापडला संकटात

अशी भावना या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण – खटाव मतदारसंघात गुंड पोसले आहेत. विरोधक, पत्रकार, साहित्यिक, अधिकारी वर्ग, सरकारी यंत्रणा यांना धाकात ठेवण्यासाठी जयकुमार गोरे हे सतत आपल्या गुंडांना उत्तेजन देत असतात. गेल्या आठवडाभरापासून आमदार जयकुमार गोरे यांच्या घोटाळ्यांची, दादागिरीची चिरफाड करणारी बातमीदारी ‘लय भारी’ने आक्रमकपणे केलेली आहे. यात जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत. जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला. जयकुमार गोरे यांच्या विकासाचा बुरखा फाडणाऱ्या या प्रतिक्रिया ‘लय भारी’ लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांची संभावना ‘जनावरांवर भुंकणारा कुत्रा’ अशी केली आहे. ही उपाधी सार्थ ठरविण्याचा चंग जयकुमार गोरे बांधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार एखादं कुणी चांगलं काम करीत असेल तर त्याला ते काम करू द्यायचं नाही, त्या व्यक्तीवर कुत्र्यासारखं भुंकायचं, अशी कार्यपद्धतीत जयकुमार गोरे यांची आहे. हे भुंकण्याचं काम जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. जयकुमार गोरे यांच्या या गुंडगिरीला भीक न घालता ‘लय भारी’ने बाजारात सामान्य लोकं व महिलांच्या प्रतिक्रीया घेतल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी