27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रअजय देवगणच्या 'तानाजी' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

अजय देवगणच्या ‘तानाजी’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

टीम लय भारी

मुंबईः अजय देवगणच्या ‘तानाजी’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीत सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अजयच्या ‘तानाजी’ या सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘तानाजी’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणे ‘अभिमानास्पद’ आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजय देवगणने दिली आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजय देवगण म्हणाला, 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे. या पुरस्काराने मला आतापर्यंत तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ‘तानाजी’ सिनेमासाठी मिळाला आहे.

अजय देवगण पुढे म्हणाला, ‘तानाजी’ सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणं हे अभिमानास्पद आहे. या सिनेमातील प्रत्येकाचा सिनेमा यशस्वी होण्यात मोलाचा वाटा आहे. सिनेमातील प्रत्येकाचे आभार, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन ! आधी अजय देवगणला 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘जख्म’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच ‘द लिजेंड ऑफ भगत’ या सिनेमासाठीदेखील अजयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

हे सुध्दा वाचा:

‘तो पुन्हा येईल’

VIDEO : नवयुगातील ‘श्रावणबाळ’

VIDEO : प्लास्टिकचा वापर आरोग्यास घातक

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!