28 C
Mumbai
Thursday, December 7, 2023
घरमहाराष्ट्रराज्यपाल कोश्यारींनी माजी पंतप्रधानांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण नाकारले; अशोक चव्हाण यांचा आरोप

राज्यपाल कोश्यारींनी माजी पंतप्रधानांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण नाकारले; अशोक चव्हाण यांचा आरोप

रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी नाकारल्याची माहिती असून, राज्यपाल येण्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करून घ्या, असेही राज्यपाल कार्यालयाने कळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यापिठाने राज्यपाल येण्याच्या अवघ्या एक दिवस आधी २० डिसेंबर रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे, हे योग्य नसल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली, ते म्हणाले येत्या २१ डिसेंबर रोजी रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापिठाचा दीक्षांत समारोह नियोजित आहे. याच वेळी विद्यापिठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती. मात्र, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

येथील संस्कृती, परिस्थीती हा दृष्टीकोण समोर ठेवल्यास भारताचा विकास : मोहन भागवत

हिवाळी अधिवेशन : राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांना हटवा, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

अशोक चव्हाण म्हणाले, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते असले तरी ते देशाचे पंतप्रधान होते. देशातील एक उत्तुंग व विद्वान नेते म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदारही राहिले होते. देशाची अर्थव्यवस्था नाजूक असताना त्यांच्या काळात देशामध्ये अनेक महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांनी केले असते तर ते अधिक योग्य ठरले असते.

२१ डिसेंबर रोजी कुलपती या नात्याने दीक्षांत समारोहासाठी राज्यपाल विद्यापिठात येत असताना देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण आदल्या दिवशीच उरकून घेण्यामागे नेमके प्रयोजन तरी काय? असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी