28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रभगवानही म्हणतात... राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे!

भगवानही म्हणतात… राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे!

देवांचा राजा इंद्र याच्या रसिकपणाबद्दल सर्वच जाणून आहोत. मदिरा, मदिराक्षी आणि इंद्र यांचे तर नाते सर्वश्रुतच आहे. अहो ! पण आता तुम्हाला ऐकून खरोखरच नवल वाटेल, तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हणे सीतेसोबत बसून मदिरेचा आस्वाद घ्यायचे. आता तर खरोखरच “हे राम… तुम्ही सुद्धा “! असे म्हणण्याची वेळ श्रीरामभक्त भाजपवर आली आहे. कर्नाटकमध्ये निवृत्त प्राध्यापक के. एस. भगवान (K.S.Bhagwan) यांनी भगवान श्रीराम यांच्याविषयी हे वादग्रस्त विधान केले आहे. (Bhagwan also says… Ram used to sit and drink alcohol with Sita Maiya!) यासाठी भगवान यांनी पुरावा म्हणून थेट वाल्मिकी रामायणातला संदर्भ दिला आहे. त्यामुळे आता मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

अंधश्रद्धा निर्मूलनकारांचा विज्ञानावरही अविश्वास; राम कदम यांची खोचक टीका

श्याम मानव म्हणाले, धिरेंद्र महाराजांमुळे देशाचे नाव जगात होईल!

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!


बंगरूळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान निवृत्त प्राध्यापक आणि प्रसिद्ध लेखक के. एस. भगवान यांनी थेट मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे सीतेसोबत बसून दारू प्यायचे असे म्हंटले आहे. ते म्हणाले, सध्या राम राज्याची सर्वत्र चर्चा आहे. पण जर तुम्ही वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड वाचले तर तुमच्या लक्षात येईल की, राम हे आदर्श नव्हते. त्यांनी ११ हजार वर्षे राज्य केले नव्हतं. तर केवळ ११ वर्षेच राज्य केले होते.” पुढे त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. भगवान म्हणाले, “भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसमवेत बसायचे आणि उरलेला पूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे… त्यांनी त्यांची पत्नी सीतेला अरण्यात पाठवले आणि तिचा बिलकुल विचार केला नाही…एका झाडाखाली तपश्चर्येसाठी बसलेल्या शंबुक या शूद्र व्यक्तीचे मुंडकं त्यांनी धडावेगळं केलं होतं, असा दावा करत त्यामुळे ते आदर्श कसे असू शकतील?” असा सवालही भगवान यांनी उपस्थित केला आहे.
के. एस. भगवान यांच्या या विधानावर आता श्रीरामाला आदर्श मानणाऱ्या आणि त्यांच्या नावे राजकारण करणाऱ्या भाजपकडून कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कोण म्हणतं श्रीराम आदर्श होते?

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या आदर्शाचे दाखले दिले जात असले तरी त्यांच्या या आदर्शबाबत के. एस. भगवान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वतःच्या पत्नीला सीतेला अरण्यात पाठवून तिचा विचार केला नाही. दुपारच्यावेळी श्रीराम सीतेसोबत बसायचे आणि उरलेला संपूर्ण दिवस दारू पिण्यात घालवायचे. ते राम आदर्श कसे ठरतील, असा सवाल के. एस. भगवान यांनी आपुल्या ट्विटमध्ये उपोस्थित केला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी