29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रLPG: एलपीजी ग्राहकांसाठी मोठे बातमी ! घरगुती एलपीजी सिलेंडर लवकरच QR कोडसह

LPG: एलपीजी ग्राहकांसाठी मोठे बातमी ! घरगुती एलपीजी सिलेंडर लवकरच QR कोडसह

देशातील घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांना सरकार देणार मोठा दिलासा देणार आहे. देशात लवकरच क्यूआर कोड (QR Code) असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहेत.

तुम्ही देखील (LPG) गॅस सिलेंडर वापरत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. देशातील घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांना सरकार देणार मोठा दिलासा देणार आहे. देशात लवकरच क्यूआर कोड (QR Code) असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहेत. अनेकवेळा ग्राहक तक्रारी करतात जसे की, त्यांच्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये गॅस च्या प्रमाणात 1, 2 किलो फरक जाणवतो. अश्या वेळी ग्राहकांच्या अडचणी सुटत नाही त्यामुळे गॅस चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील होत नाही. अशा लोकांना पकडण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (LPG) गॅस सिलेंडर आता (QR) कोडने सुसज्ज करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार आहेत.
या सुविधेला ‘रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी’ असे नाव देण्यात आले असून यासंदर्भात केंद्र सरकार मंत्रालयाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला त्या ट्विट मध्ये असे नमूद केले की, ‘इंधन शोधण्यायोग्यता ! एक उल्लेखनीय नावीन्य हा (QR) कोड सिलेंडरवर पेस्ट केला जाईल आणि नवीन वर वेल्डेड केला जाईल. सक्रिय केल्यावर त्यात चोरी, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग अनेक समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे’.
सरकारने प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. हे काम ३ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन गॅस सिलेंडरमध्ये QR कोड टाकला जाईल. आणि गॅस सिलेंडरमध्ये क्यूआर कोडचे मेटल स्टिकर गॅस सिलेंडरवर चिकटवले जाईल.

QR कोड म्हणजे काय ?
क्विक रिस्पॉन्स कोड किंवा क्यूआर कोड हा मॅट्रिक्स बारकोडचा एक प्रकार आहे. डेन्सो वेव्ह या जपानी ऑटोमोटिव्ह कंपनीने 1994 मध्ये शोधला होता. बारकोड हे एक ऑप्टिकल लेबल आहे जे मशीनद्वारे वाचले जाऊ शकते आणि ज्या वस्तूला ते संलग्न केले आहे त्याबद्दल माहिती असते. QR कोडमध्ये वारंवार लोकेटर, आयडेंटिफायर किंवा ट्रॅकरची माहिती समाविष्ट असते. जी वेबसाइट किंवा ऍप्लिकेशनकडे नेत असते. QR कोड चार प्रमाणित एन्कोडिंग मोड (संख्यात्मक, अल्फान्यूमेरिक, बाइट/बायनरी आणि कांजी) वापरून डेटा कार्यक्षमतेने संग्रहित करतात.

एलपीजी गॅस सिलेंडर तुम्ही ट्रॅक करू शकतात
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे अध्यक्ष श्रीकांत माधव यांनी सांगितले की, पुढील तीन महिन्यांत सर्व घरगुती गॅस सिलेंडरमध्ये (QR) कोड असेल. जागतिक एलपीजी सप्ताह 2022 च्या निमित्ताने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, हा एक क्रांतिकारी बदल आहे. आता ग्राहक एलपीजी सिलेंडर ट्रॅक करु शकतात.

हे सुध्दा वाचा

Underworld Dawn : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर बोगस पीएचडीचा आरोप; युवासेनेचे विद्यापीठात आंदोलन

Video : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’!

सध्या काय नियम आहे ?
आपण जर गॅस सिलेंडर बुक करत असाल तर आपण ज्या वितरकाकडून कनेक्शन घेतले आहे. त्याच्याकडून तुम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळते. म्हणजेच एकदा तुम्ही वितरकाकडून गॅस कनेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला त्याच वितरकाद्वारे गॅस संबंधित सर्व सुविधा पुरवल्या जातात. आपल्याकडे वितरक बदलण्याचा पर्याय नाही.

या योजनेमुळे काय बदलेल ?
आपल्या शहरात ही योजना लागू झाल्यानंतर जेव्हा तुम्ही नवीन सिलेंडर बुक कराल तेव्हा तुमच्याकडे वितरक निवडण्याचा पर्याय देखील असेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सर्व वितरकांची यादी दिसेल. वितरकाचे रेटिंग आणि इतर वैशिष्ट्ये पाहून तुम्ही वितरक निवडण्यास सक्षम असाल. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या वितरकाकडून तुम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळू शकेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी