33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहादेव जानकरांच्या विश्वासू सहकाऱ्याचा वाढदिवस, लोकांसाठी करणार मदत

महादेव जानकरांच्या विश्वासू सहकाऱ्याचा वाढदिवस, लोकांसाठी करणार मदत

टीम लय भारी

बीड : राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष व महादेव जानकर यांचे सहकारी परमेश्‍वर महाराज वाघमोडे यांचा आज ( मंगळवार ) वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करण्यात येणार नाही. त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे ( Birthday of Mahadev Jankar’s follower Parmeshwar Waghmode ).

वाघमोडे हे महादेव जानकरांचे कट्टर व विश्वासू समर्थक आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीही वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन परमेश्वर महाराज वाघमोडे यांनी केले आहे. ‘कोरोना’ची साथ असल्याने समाजोपयोगी उपक्रम घ्यावेत, असे वाघमोडे यांनी म्हटले आहे ( Parmeshwar Waghmode appealed to his followers ).

Mahadev Jankar's follower
महादेव जानकर यांच्यासोबत परमेश्वर वाघमोडे

वाघमोडे हे प्रख्यात कीर्तनकार सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा बीड व परिसरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दरवर्षी उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.

mahadev jankar's follower
परमेश्वर महाराज वाघमोडे हे महादेव जानकर यांचे कट्टर व विश्वासू समर्थक आहेत

यंदा मात्र बॅनरबाजी, जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार नाही. त्या ऐवजी सामान्य लोकांसाठी फळे, धान्य, सॅनिटायझर, वह्या – पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. चाहत्यांनीही असेच सामाजिक उपक्रम साजरे करावेत, असे परमेश्‍वर महाराज वाघमोडे यांनी आवाहन केले आहे.

mahadev Jankar's follower
जाहिरात

सामाजिक उपक्रमांच्या कार्यक्रमासाठी शिरूर तालुकाध्यक्ष मच्छिंद्र शिंगाडे,  माजलगाव : कल्याण गवते, पाटोदा : शेषराव खटके, आष्टी : डॉ. शिवाजी शेंडगे, बीड : गोरख बाबर, वडवणी : बालाजी काळे, युवक जिल्हाध्यक्ष गोकुळ दहिफळे, संजय लोखंडे, लोकसभा अध्यक्ष बप्पा सोनसळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नंदा सारुक, रेखा शिंदे यांची प्रमुख उपस्थित असेल.

mahadev Jankar's follower
परमेश्वर वाघमोडे हे ख्यातनामा कीर्तनकार आहेत

सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करा असे आवाहन परमेश्‍वर महाराज वाघमोडे यांनी केले आहे. विविध ठिकाणी घेण्यात येणार्‍या फळ, पुस्तक, मास्क, सॅनिटायझर वाटप अशा कार्यक्रमास अशोक हाप्ते, पोपट भावले, धोंडराई : कृष्णा धापसे, जगदिश सवासे, कृष्णा वीर, भागवत कुलाल, सचिन खरात, बालाजी तुरे जातेगाव : रामचंद्र कोळेकर, माऊली यमगर,  ठकाजी कोळेकर, महेश खेडकर, बाळराजे बोरकर, पंकज गंडे, तलवाडा : आत्माराम मस्के, प्रविण राख, शाम महानोर, सरपंच काशिनाथ नरुटे, वसंत लोखंडे गणेश यादव, अच्युत मराठे आदी उपस्थित राहणार आहेत.

mahadev Jankar's follower
महादेव जानकर यांच्यासोबत वृक्षारोपण करताना परमेश्वर महाराज वाघमोडे

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी