26 C
Mumbai
Monday, September 30, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आमदार अनिल गोटे

भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आमदार अनिल गोटे

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी बंडखोर आमदारांच्या चौकशी करण्याचे पत्र ईडी, सीबीआय यांना पाठविले आहे. ते स्वतः मंगळवारी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. बंडखोर आमदार सध्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून मज्जा करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा खर्च नेमका कोणाकडून करण्यात येत आहे. याबाबत चौकशी व्हावी, असे अनिल गोटे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून ११ जुलै ची तारीख दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी गोंधळलेले एकनाथ शिंदे भाजपच्या गळाला लागल्याचे म्हंटले आहे. भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे देखील त्यांनी यामध्ये लिहिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांना समर्थन दिले आहे.

कुठल्याही राज्य सरकारवर अविश्वासाचा ठराव आणायचा असेल तर विधानसभाध्यक्ष व राज्यपाल हे महत्त्वाचे आहेत. त्यांना टाळून काहीच करता येणार नाही. शहाणपणाचा मार्ग कसा होता की, विधीमंडळ पक्षात बंड झाले आहे. या संबंधीची माहिती विधानसभा अध्यक्षांना देणे. लगेचच राज्यपालांना एकोणतीस आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना देवून सभागृहाच्या पटलावर येता येते, असेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

शरद पवारांनी नेमके हेच सांगितले. शरद पवारांनी राज्यात सुरु असलेल्या गदारोळाबाबत नियमाप्रमाणे जी मांडणी करून सांगितली, त्याला या बंडखोरांनी गुंडगिरीचे नाव दिले. गल्लीतल्या गावगुंडासारखे भांडणाचे स्वरूप देऊन त्यांनी टप्प्यात आलेला हा खेळ हातातून घालविला. आता सर्वोच्च न्यायालयाने खुंठी ठोकली आहे. दावा फेटाळून तुम्ही अध्यक्ष वा राज्यपालांकडे जा, तेथे काही घडले नाही तर मग आमच्याकडे या असे जर बंडखोर आमदारांच्या वकिलांकडून सुचविण्यात आले असते तरी, हा डाव सावरता आला असता, असेही अनिल गोटे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. पण भाजपच्या कसलेल्या कारस्थान्यांनी विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांना गृहित धरून एकनाथ शिंदेंच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत शिवसेनेत उभी फूट पाडण्याचा आपला कार्यक्रम पार पाडला, असे गोटे यांच्याकडून लिहिण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये बंड केलेल्या आमदारांची कान उघाडणी देखील अनिल गोटे यांनी केली आहे. त्यांनी बंड केलेले बंडोबा उद्या थंड नाही झाले म्हणजे ठीक, असे म्हणत अनिल गोटे यांनी ‘मुझे तो अपनोनेही लूटा.. गैरो मे क्या दम था !.. मेरी कश्ती वही डुबी.. जहॉ पानी कम था !’ अशी शायरी लिहिली आहे.

https://www.facebook.com/104198522270775/posts/pfbid02KoS24MEDhDf3Dt4B5k4DcKE1gT2yZsip4Bc4GWxJnBZurZXWQcedRHFKN9mMuqBil/

हे सुद्धा वाचा :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

देशाच्या हवामानात मोठा बिघाड

उद्धव ठाकरे यांना एका आंबेडकरवाद्याचे पत्र !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी