34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे निधन

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी यांचे निधन

भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रवक्ते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांच्या पत्नी सुमित्रा भंडारी (Sumitra Bhandari) यांचे काळ रात्री पुण्यात (Pune) अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील नवी पेठ येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. बुधवारी दुपारी ४.०० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत. त्या मागील कित्येक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या.  (BJP spokesperson Madhav Bhandari’s wife Sumitra Bhandari passed away)

सुमित्रा भंडारी यांच्या निधनाने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे. परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या त्या कन्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपला सामाजिक कार्याचा प्रवास सुरु केला. लग्नानंतरही पुणे आणि कोकणात त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने माधव भंडारी यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.

 हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात विश्व मराठी साहित्य संमेलन; पण ठाकरेंना निमंत्रणच नाही!

इम्रान खान यांच्यावर एकाचवेळी चार वेगवेगळ्या ठिकाणाहून केला गेला होता गोळीबार

विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सुमित्रा भंडारी यांना श्रद्धांजली अर्पण केली असून आपण भंडारी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हंटले आहे. भंडारी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीदेखील सुमित्रा भंडारी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाल्याचे ट्विटरवरील शोकसंदेशात म्हंटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी