28 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरमहाराष्ट्रभाजपने विरोधकांवर 'उदयनअस्त्र' सोडले!

भाजपने विरोधकांवर ‘उदयनअस्त्र’ सोडले!

अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलनकर्त्याना शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे पडसाद शनिवारी दिवसभर उमटले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (दि.2) रोजी दुपारी जालनामध्ये पोहचले. नंतर लाठीचार्ज झालेल्या गावात ते पोहचले आणि आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे भाजपा खासदार उदयराजे भोसले आधीच उपस्थित होते. शरद पवार हे आंदोलन हायजॅक करणार अशी भीती भाजपला होती. त्याचे संकेत भाजपला मिळाल्याने त्यांनी ‘उदयनअस्त्र’ विरोधकांवर सोडले! अशीच चर्चा जालनामध्ये दिवसभर होती. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज का केला, त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी यावेळी उदयनराजे भोसले यांनी केली.

ही घटना गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. हवा तसा बळाचा वापर जालना येथील घटनेत करण्यात आला. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठीहल्ला केला. मुंबईहून आदेश आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

जालना येथे घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न रहाता इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही तिघांनी इथे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली, जखमी लोकांना भेटलो. आश्चर्य वाटेल असा बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्त्रिया लहान मुले यांनासुद्धा पाहिले नाही. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठीहल्ला केला. हवेत गोळीबार करून ज्वारीच्या साईजचे छरे जखमींना लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात, त्या मंत्रिमंडळात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असेही शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

आंदोलन शांततेने व्हावं कायदा हातात घेण्याचे काम कोणी करू नये. चर्चा सुरू असताना एकदम लाठीहल्ला केला, त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतील तर त्याची जबाबदारी ज्यांनी निर्णय घेतला त्यांची आहे. जखमी लोक आणि आंदोलकांनी सांगितले की, पोलिसांना वरून आदेश देण्यात आले. पोलिसांवर हल्ला झाला नाही, पोलिसांकडून हल्ला झाला. मात्र यात पोलिसांना मी दोष देणार नाही. त्यांना ज्यांनी आदेश दिला? याची उच्चस्तरीय नाही तर यासाठी न्यायालयीन चौकशीची गरज आहे.आंदोलकाना शांतता प्रस्थपित करण्याचे मी आवाहन केले, जाळपोळ करू नये असेही शरद पवार म्हणाले.

फडणवीसांना उत्तर
शरद पवार मुख्यंमत्री असतांना गोवारीमध्ये झालेल्या आंदोलनात अनेकांचे जीव गेले होते. पण त्यावेळी शरद पवारांनी तिथे भेट दिली नाही आणि राजीनामासुद्धा दिला नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देतांना आज शरद पवार म्हणाले की, ‘गोवारीमध्ये आंदोलनात चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी मी नागपुरात नव्हतो, मुंबईत होतो. या घटनेनंतर माझ्या सरकारमधील आदिवासी कल्याण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांची जबाबदारी काय?’ असे म्हणत पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी