30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरमहाराष्ट्रराहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा ब्लॅक प्रोटेस्ट

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा ब्लॅक प्रोटेस्ट

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज (दि. 27) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. काँग्रेस पक्षांच्या खासदार काळे कपडे परिधान करत संसदेत आले. राहुल गांधी यांचे निलंबन आणि अदाणी प्रकरणी जोरदार घोषणाबाजी केली. प्रचंड गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. (Black protest of Congress)

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसचे खासदार काळे कपडे परिधान करत संसदेत आले. यामध्ये सोनिया गांधी यांचाही समावेश होता. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर काळे झेंड फडकावले तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा ब्लॅक प्रोटेस्ट

काँग्रेसने बोलविलेल्या बैठकीत तृणमूल खासदार सहभागी !

संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या कक्षात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी काँग्रेससह द्रमुक, समाजवादी पार्टी, बीआरएस, सीपएम, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेससह 17 पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी उपस्थिती लक्षणीय ठरली. लोकशाहीच्या सुरक्षेसाठी जे आमच्या सोबत येतील त्यांचे स्वागतच होईल, असे खर्गे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

राहुल गांधी यांची खासदारकी जाणार?

अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न; मोदी सरकारची कोंडी!

नारायण राणेंनी राहुल गांधींच्या हाताखाली काम केलेले माहीत नाही का; नितेश राणे यांच्यावर काँग्रेसचा पलटवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी