29 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमहाराष्ट्रबॅंकिंग क्षेत्र अडचणीत असताना बाळासाहेब थोरातांच्या अमृतवाहिनी बँकेची गौरवास्पद कामगिरी

बॅंकिंग क्षेत्र अडचणीत असताना बाळासाहेब थोरातांच्या अमृतवाहिनी बँकेची गौरवास्पद कामगिरी

देशातील सहकारी बॅँका, पतसंस्थांची स्तिती खराब असल्याचे चित्र असताना काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची घोडदौड मात्र वेगाने सुरु आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनु असलेल्या या बॅँकेला देशपातळीवरील बॅँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन पुरस्कार – 2023 हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात असूनही पाचशे कोटींची ठेव असलेल्या या बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको या राष्ट्रीय स्तरीय संस्थेने सन 2022- 23 चा ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित केले आहे. बॅँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी व उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात अनेक पतसंस्था, सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत, अनेक बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून काही बँकांवर रिझर्व बँकेने कारवाई देखील केली आहे. अशा स्थितीत संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी गंगाजळी ठरलेली अमृतवाहिनी बॅँक मात्र सातत्याने ऑडिटचा अ दर्जा टिकवून आहे. गरजू शेतकरी, सर्वसामान्यांना अडचणीच्या काळात आर्थिक सक्षमीकरणासाठी बॅँकेने सतत मदतीचा हात दिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली बॅँकेने छोटे शेतकरी, व्यावसायिकांसाठी सतत विविध योजना राबवून लोकांना मदत केली आहे. बॅँकेमार्फत 500 500 दूध उत्पादकांना बिगर तारण दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार व ऊस वाहतुकीसाठी 30 कोटी रुपयांचे कर्ज बँकेने प्रथमच उपलब्ध करून दिले आहे.

हे सुद्धा वाचा 
नीरजने रचला इतिहास; ठरला जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पटकावणारा पहिला भारतीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर, अमित शाहांसोबत बैठक
सनी पाजीच्या गदर २ ने अक्षय कुमारचा ओएमजी २, रजनीकांतच्या जेलरला मागे टाकत कमावले इतके कोटी!

बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत. याचबरोबर नव्याने आश्वी बु. व संगमनेर खुर्द येथील शेतकी संघ पेट्रोल पंपाजवळ बँकेची शाखा सुरू केली जाणार आहे. बॅँकेच्या मुख्य शाखेत अत्याधुनिक लॉकर ची सुविधा व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. यापूर्वीही अमृतवाणी बँकेला 2022 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. 4 ते 6 ऑक्टोबर 2023 दरम्यान दमन येथील शानदार कार्यक्रमात या पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात येणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी