बुधवारी रक्षाबंधननिमित्ताने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूड कलाकारांनीही यंदाची रक्षाबंधन मोठया थाटामाटात साजरी केली.अभिनेता अक्षय कुमार, कंगना राणौत, क्रिती सॅनॉन आणि माधुरी दीक्षितपासून ते दिग्दर्शक झोया अख्तरपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या भावंडांबद्दलचे फोटो आणि पोस्ट शेअर केल्या आहेत.
अभिनेता अक्षय कुमारने त्याची बहीण अलका भाटियासोबतचा जुना फोटो पोस्ट करत लिहिले की “तू आयुष्यात माझ्यासोबत असशील तर आयुष्यात सर्व काही ठीक आहे. माझी बहीण माझी शक्ती स्तंभ आहे ” दरम्यान, कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर, बालपणीचा एक मोहक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोत कंगना भाऊ अक्षत आणि बहीण रंगोली चंदेल देखील आहे.


‘ कुली नंबर 1 ‘ चित्रपटची जोडी अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खाननेही दणक्यात रक्षाबंधन साजरी केली. ‘ते सुकून की खातिर मेरी बहना, तेरा भाई हमेशा तेरे साथ है’ अशी पोस्ट वरुण धवनने इंस्टाग्रामवर लिहिली.
अभिनेत्री सारा अली खानने सख्खा भाऊ इब्राहिम अली खान आणि सावत्र भाऊ तैमूर आणि इब्राहिम सोबत रक्षाबंधन साजरी केली. यावेळी पतौडी परिवारही सोबत होता.