33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रBudget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पोहोचल्या राष्ट्रपती भवनात; काय आहे त्यांचा...

Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन पोहोचल्या राष्ट्रपती भवनात; काय आहे त्यांचा पेहराव याबाबत उत्सुकता

सकाळी 11 वाजता सादर करणार केंद्रीय अर्थसंकल्प; मोदी सरकारचा सध्याच्या पर्वातील शेवटचा अर्थसंकल्प; आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अर्थसंकल्पाला महत्त्व

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या आहेत. त्या आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा सध्याच्या पर्वातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प आहे. आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाला महत्त्व आहे. (Budget 2023 : Finance Minister Nirmala Sitharaman arrives at Rashtrapati Bhavan; Curious about what they are wearing)

सीतारामन यांनी 2019 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना दरवर्षी वेगवेगळ्या हातमाग साड्या परिधान केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांचा साधा भारतीय पेहराव हाही नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. यावर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्या तपकिरी किनार असलेली चमकदार लाल साडी परिधान करून आल्या आहेत. सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी 11 वाजता सुरू होईल.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू झाले असून पहिल्या सत्राचा समारोप 13 फेब्रुवारीला होणार आहे. 6 एप्रिल रोजी संपणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला 12 मार्च रोजी सुरुवात होईल. यंदाच्या अर्थसंकल्पात तूट कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा आहे. नोकरदार व्यक्तींसाठी आयकर सूट मर्यादा वाढविण्याच्या बहुप्रतिक्षित मागणीची यंदा तरी पूर्तता होते का, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा : Budget 2023 : यंदाही मिळणार आश्वासनांचे गाजर!

बजेट २०२३ : ‘सेक्स’वर कर, तुमच्या आत्म्यावरही कर ; या आहेत जगातील जुलमी कर पद्धती

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा गंभीर आरोप

केंद्र सरकार (Central Govt) ने चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी एकूण 65,000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले होते. यापैकी, सरकारने आतापर्यंत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील समभाग विकून सुमारे 31,000 कोटी रुपये उभे केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल, 31 जानेवारी रोजी चालू आर्थिक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर केले होते. त्या सर्वेक्षण अहवालानुसार, पुढील आर्थिक वर्ष 2023-24 साठी देशाच्या आर्थिक वाढीचा दर 6-6.8 टक्‍क्‍यांवर राहण्याची अपेक्षा आहे. तर बेसलाइन रिअल जीडीपी 6.5 टक्के असेल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी