29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रशेतकऱ्याकडून एक लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह, लिपीक आणि वकिलाला अटक

शेतकऱ्याकडून एक लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह, लिपीक आणि वकिलाला अटक

बुलडाण्यात (Buldana) भूसंपादनाच्या (Land acquisition) मोबदल्याची रक्कम खात्यावर जमा करुन देण्यासाठी शेतकऱ्याकडे एक लाख रुपयांची लाच घेताना (bribe)भुसंपादन विभागाचे उपजल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. (Buldana Anti-corruption Department arrested Deputy District Magistrate) त्यांच्यासोबत लिपिक नागोराव खरात आणि वकिल अनंता देशमुख य़ा दोघांना देखील ताब्यात घेतले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पात तक्रारदार शेतकऱ्याच्या वडिलांची जमीन भूसंपादित करण्यात आली होती. या जमीनीचा मोबदल्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या एवजी तक्रारदाराच्या चुलत्याचे नाव यादीत आले होते. ही चुक दुरस्त करण्यासाठी घुगे यांनी शेतकऱ्याकडे मोबदल्याच्या दहा टक्के रक्कम मागितली होती. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता स्विकारताना एसीबीने घुगे यांना रंगेहात पकडत अटक केली आहे. त्यांच्यासोबत लिपीक खरात आणि वकील देशमुख या दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा 

पेलेच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली; म्हणाले त्यांची कारकीर्द भावी पिढ्यांना ते प्रेरणा देईल

ऋषभ पंतला पेंग आल्यामुळे झाला अपघात; दोनशे मीटर पर्यंत गाडीने घेतल्या पलट्या..

विवेक अग्निहोत्रीच्या मुलीचे ‘बेशरम रंग’ व्हायरल; भगव्या बिकीनीतील अश्लील फोटोवरून हिंदुत्वाचा ‘पठाण’ अडचणीत !

संबंधित शेतकऱ्याला जमीनीचा २१ लाख रुपयांचा मोबदला मिळणार होता. मात्र यादीत चुकीचे नाव आल्याने ही चुक दुरुस्त करण्यासाठी घुगे यांनी मोबदल्याच्या १० टक्के रकमेची मागणी केली. त्यानुसार २.१७ लाख रुपये लाच घुगे यांनी मागितली होती. या लाचेचा पहिला १ लाख रुपयांचा हप्ता स्विकारताना एसीबीने घुगे सह लिपिक खरात आणि वकील देशमुख यांना अटक केली आहे. ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी