31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात व्यावसायिकाने कार पेटवून केली आत्महत्या; घटनेत पत्नी व मुलगा जखमी

नागपुरात व्यावसायिकाने कार पेटवून केली आत्महत्या; घटनेत पत्नी व मुलगा जखमी

टीम लय भारी

नागपूर : नागपूरमध्ये व्यावसायिकाने कारला पेटवून आत्महत्या (Businessman commits suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये व्यवसायिकाची पत्नी आणि मुलगा देखील गंभीर जखमी झाले आहेत. नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात हि घटना घडली. रामराज भट असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आर्थिक अडचणी वाढल्याने या व्यावसायिकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामराज भट यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. ते विविध कंपन्यांना नट-बोल्टचा पुरवठा करायचे. परंतु लॉकडाऊनमध्ये त्यांचे या व्यवसायामध्ये नुकसान झाले. आणि ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचण जाणवू लागली. रामराज भट यांचा मुलगा नंदन हा इंजिनियर असून त्यांनी त्याला या व्यवसायामध्ये लक्ष घालण्याची आणि हा व्यवसाय सांभाळायची विनंती देखील केली होती. परंतु नंदनने हा व्यवसाय सांभाळण्यास नकार दिला होता.

दरम्यान, रामराज भट हे आपल्या कुटुंबासमवेत जेवण करण्याच्या निमित्ताने बाहेर पडले होते. यावेळी रामराज भट यांनी त्यांची कार खापरी पुनर्वसन केंद्राजवळ थांबवली. त्यानंतर पत्नी आणि मुलाला काही कळायच्या आत त्यांनी तिघांच्या अंगावर द्रवपदार्थ फवारला आणि कारला आग लावली. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलाने कारमधून उडी घेतल्याने ते या घटनेतून थोडक्यात बचावले. परंतु रामराज भट यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

सदर घटनेनंतर नागरिकांनी याबाबतची माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याला दिली. परंतु पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच या आगीत कारचा जाळून कोळसा झाला होता.

हे सुद्धा वाचा :

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

विदर्भात शिंदे गट शिवसेना फोडणार? ‘मिशन विदर्भ’ लवकरच सुरू

शिंदे गटाचे भविष्य आज ठरणार? खंडपीठाची आज महत्त्वपूर्ण सुनावणी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी