29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात; आठ लाखांची लाच घेताना पडली धाड

पुण्यातील IAS अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात; आठ लाखांची लाच घेताना पडली धाड

पुण्यातील एका IAS अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. हा अधिकारी महसुल विभागात कार्यरत आहे. तब्बल आठ लाख रुपयांची लाच स्विकारतानाच सीबीआयने धाड टाकत त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका IAS अधिकाऱ्यावर अशी कारवाई सीबीआयने केल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

अनिल रामोड असे या IAS अधिकाऱ्याचे नाव असून ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. एका जमीनीच्या व्यवहारात ते आठ लाख रुपयांची लाच स्विकारताना सीबीआयने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्याच नेतृत्वाखाली ही कारवाई होत असल्याची माहिती देखील समोर येत आहेत. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याव सीबीआयने धाड टाकल्यामुळे पुण्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जोरदार चर्चा रंगली आहे. या छाप्यामुळे आणखी कोणते घोटाळे समोर येतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

पवारांचे महाराष्ट्राला शांततेचे आवाहन; सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या!

जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी भेट

वाचाळवीर निलेश राणेंवर बॅन घाला; भाजपला संजय काकडेंचा घरचा आहेर

मिळालेल्या माहितीनुसार एका महामार्गालगत असलेल्या जमीनीच्या व्यवहारासाठी अनिल रामोड हे आठ लाख रुपयांची लाच स्विकारताना सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडल्याचे समजते. सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. सीबीआयने केलेली पुण्यातील ही मोठी कारवाई असून या छाप्यातून आता आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात, रामोड यांचे काही बेकायदा व्यवहार होते, का अशा अनेक गोष्टींची चौकशी होऊ शकते.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी