28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रCBI : महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार सीबीआयचा सिलसिला

CBI : महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार सीबीआयचा सिलसिला

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात सीबीआयला (CBI) बंदी घालण्यात आली असली, तरी ईडीच्या कारवाया मात्र दणक्यात सुरू आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते ईडीच्या कचाटयात सापडले आहेत.

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात सीबीआयला (CBI) बंदी घालण्यात आली असली, तरी ईडीच्या कारवाया मात्र दणक्यात सुरू आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते ईडीच्या कचाटयात सापडले आहेत. अनेकांना तुरुंगवास घडला आहे. आता शिंदे फडणवीस सरकारने सीबीआयवरची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेमध्ये असतांना सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तपासणीचे अधिकार नव्हते. परंतु आता सत्तांतर झाल्यानंतर हे अधिकार पुन्हा मिळणार असल्याची महिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्यात ईडी प्रमाणेच सीबीआयला चौकशी करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज भासणार नाही.
महाराष्ट्रात आता ईडीबरोबरच सीबीआयचा स‍िलस‍िला सुरू होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Shree Sevagiri Lecture Series : श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन

Manish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

Blood Donation Camp : लग्नघाईत रक्तदानाचा मुहूर्त

सीबीआय स्थापना कधी झाली ?
भारतात सीबीआयची स्थापना ही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस झाली. भारतात युद्ध सामग्री उत्पादनात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. त्यावर न‍ियंत्रण म‍िळवण्यासाठी एका संस्थेची स्थापना करण्यात आली. तिच सीबीआय या नावाने ओळखली जाऊ लागली. ब्रिटीश सरकारने भारतात युद्ध सामुग्री उत्पादनासाठी मोठी कंत्राटं दिली. यावेळी भ्रष्टाचार सुरू झाला. तो थांबवण्यासाठी ब्रिटीश सरकारने special police establishment act नावाने भ्रष्टाचार विरोधी कायदा सुरू केला. त्यावेळी ही संस्था युद्ध व‍िभागाच्या अधिपत्याखाली होती.

दुसरे महायुद्ध संपल्यावर केंद्र सरकारला भ्रष्टाचारासंबंधी प्रकरणे हाताळण्यासाठी एका केंद्रीय तपास संस्थेची गरज भासू लागली. तेव्हा 1946 मध्ये कायद्यामध्ये सुधारणा करुन हा कायदा करण्यात आला. त्यानंतर ही संस्था गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली आली. भारत सरकारने सगळया विभागांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे अधिकार या संस्थेला दिले. या संस्थेचे खास वैशिष्टय असे की, ही संस्था केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेशात थेट तपास करू शकते. राज्‍य सरकारने परवानगी दिली, तर राज्यातील केसही सीबीआयकडे सोपवल्या जाऊ शकतात. संपूर्ण भारतात दहा ठिकाणी सीबीआयची कार्यालये आहेत.

पंडीत नेहरू पंतप्रधान असतांना 1963 मध्ये औपचारीकरित्या सीबीआयची स्थापना झाली. Central Bureau Of Investigation म्हणजे केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाची स्थापन झाली. त्यावेळेस डी.पी. कोहली हे या संस्थेचे संस्थापक होते. 1965 साली या संस्थेला आणखी अधिकार देण्यात आले.  हत्या, दहशतवादी कारवाया, अपहरण या सारख्या गुन्हयांचा तपास देखील ही संस्था करू लागली. देशातील गुन्हयांचा तपास करणारी ही सर्वांत मोठी संस्था आहे. सीबीआयचा राजकीय कामांसाठी वापर केला जातो असा आरोप होऊ लागला.

सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष करण्यासाठी सीबीआयचा  वापर करु लागला. साधारपणे 70 च्या दशकांपासून सीबीआयचे राजकीय हत्यार म्हणून वापर होऊ लागला. सीबीआयची स्थापना झाली. तेव्हा ती गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली होती. त्यानंतर ती कार्मिक, सार्वजन‍िक तक्रार तसेच निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अखत्यारीत आली. आता या विभागावर पंतप्रधान कार्यालयाचे न‍ियंत्रण आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी