26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरमहाराष्ट्रराज्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता

राज्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता

टीम लय भारी

मुंबईः राज्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. राज्यातील 6 जिल्हयात 4 दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, गडचिरोली जिल्हयांचा समावेश आहे.मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून, अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर शहापूर तालुक्यात 4 जण वाहून गेले. पालघरच्या सोमटा गावात पहाटे घर कोसळले. वसईला विरारला रात्रंदिवस पावसाने झोडपून काढले आहे. वसईमधील राजूरीमध्ये दरड कोसळली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. भिवंडी शहरात पाणी घुसले असून, वीजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुणे जिल्हयात देखील संततधार सुरुच आहे. भूगाव रोडवर पाणी साचले होते. पुण्याचे खडकवाला धरण 100 टक्के भरले आहे. लोणावळयाच्या भुशी धरणाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयात मधूमती नदीला पूर आला आहे. तर नाशिकमधील दारणा, गंगापूर धराणातून विसर्ग सुरु असून, गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केले आहे. नाशिक मधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा:

बंडखोरी करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतले बाळासाहेबांचे दर्शन

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

होऊ द्या चर्चा…! पुन्हा मुख्यमंत्री शिंदे चर्चेत

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!