34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रChandrkant Patil : आम्हाला एकनाथजींची शिवसेना पूरेशी; उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले चंद्रकांत...

Chandrkant Patil : आम्हाला एकनाथजींची शिवसेना पूरेशी; उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

सावरकर यांच्या निमित्ताने उद्धवजींच्या आपली चूक झाल्याचे लक्षात आले असेल तर ते सर्वसामान्यांना देखील आवडेल, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली पाहीजे असे नाही, कारण आम्ही आता खुप पुढे गेलो

सावरकर यांच्या निमित्ताने उद्धवजींच्या आपली चूक झाल्याचे लक्षात आले असेल तर ते सर्वसामान्यांना देखील आवडेल, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली पाहीजे असे नाही, कारण आम्ही आता खुप पुढे गेलो असून आम्ही एकनाथजींची शिवसेना पूरेशी आहे, आम्ही एकनाथजींच्या शिवसेनेसोबत सत्ता आणू शकतो, असे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.

राहूल गांधी यांच्या सावरकरांच्या माफीनाम्याच्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप, शिंदे गट, महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने राहूल गांधी यांना जोरदार विरोध केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील राहूल गांधी यांच्या वक्तव्याबाबत असहमती दर्शवली आहे, त्यानंतर चंद्रकात पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यात योगदान आहे याबाबत काँग्रेसची असहमतीच आहे, जेव्हा एखाद्याची प्रतिमा कमी करायची असेल तेव्हा काँग्रेसकडून अशी विधाने केली जातात. या आधी देखील काँग्रेसने अशी विधाने केली, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना अक्षरश: झोडपून काढायचे, मात्र सत्तेसाठी उद्धवजी मधल्याकाळात अशा विषयांबाबत भूमिका घेताना शांत राहत होते. मात्र सावरकरांबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करतो त्यांनी हिंदुत्वाशी अशाच भूमिका घेतल्यास जनतेला आनंदच होईल असे पाटील म्हणाले.
हे सुद्धा वाचा :

Bharat Jodo Yatra : ‘सावरकरांबद्दल काँग्रेस-सेनेची मते वेगळी पण…’ जयराम रमेश यांचे विधान

MNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले

Bhima Koregaon Case : आनंद तेलतूंबडे यांना जामीन मंजूर; पण काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार

मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत चंद्रकात पाटील म्हणाले, आम्ही आता आम्ही खुप पुढे गेलो असून एकत्र येण्याची गरज नाही. मात्र शिवाजी पार्कवर हिरवे झेंडे लावणे, अजानाच्या स्पर्धा घेणे… अशा दिशेने ठाकरे यांची जी गाडी चालली होती, ती पुन्हा ट्रॅकवर आली असे. लव्ह जिहाद, धर्मांतराच्या मुद्द्यावर त्यांच्या देखील मनात आग पेटली आहे, ती काँग्रेसमध्ये नाही, कारण ती व्होट बॅँक त्यांची आहे, उद्धव ठाकरे यांची नाही, त्यांना सत्तेसाठी मोह झाल्याने ते त्यांच्यासोबत गेले होते. पण जर आता ठाकरे यांच्या मोठी चूक झाल्याचे लक्षात आले असेल तर ते सर्वसामान्यांना देखील आवडेल, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी