32 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरमहाराष्ट्रअयोध्येतील राम मंदिर उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान!

अयोध्येतील राम मंदिर उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान!

रामजन्मभूमी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. ‘रामलला’ मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानातील खास दगडांचा वापर करण्यात आला आहे. आता अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान असणार आहे. मंदिरासाठी लागणारे 1800 क्यूबिक मीटर लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. आज, 29 मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे.

 

अयोध्येतील राम मंदिराच काम पुर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. येत्या काही दिवसात ते भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या राम मंदिराच्या उभारण्यासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जी.ए. मोटकर यांनी याबबत माध्यमांना माहिती दिली कीस, सुमारे 1855 धनपूट सागवानाचे लाकून दिले जाईल. हा करार तब्बल 1.32 कोटी रुपयांचा आहे.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक जी. ए. मोटकर यांनी सांगितले की, डेहराडून फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने राम मंदिर ट्रस्टला शिफारस केली होती की, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये उत्तम दर्जाचे लाकूड मिळू शकेल. हे लाकूड अतिशय दर्जेदार आहे. सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामातही या लाकडांचा वापर करण्यात आला आहे.

 

आज (29 मार्च) श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सागवान लाकडाची पहिली खेप अयोध्याकडे रवाना होणार आहे. त्यानिमित्ताने बल्लारपूरच्या एफडीसीएमच्या डेपोतून माता महाकाली मंदिर, चंद्रपूर शहर मार्गे या सागवान लाकडाची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच ठीक ठिकाणी काष्टपूजन होणार आहे. दुपारी 3.30 वाजता फॉरेस्ट एन्ट्री गेट, अलापल्ली रोड, बल्लारपूर येथून काष्ठ शोभायात्रेस सुरवात होणार असून सायंकाळी 6 वाजता सर्वधर्मीय भव्य काष्ठपूजन सोहळा माता महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे होणार आहे. तर रात्री 9 वाजता संगीतकार कैलास खेर यांचा रामगीतांचा कार्यक्रम चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

हे सुद्धा वाचा:

योगींनी उत्तरप्रदेशसाठी मुंबईतून ५ लाख कोटी नेले!

हे राम! अयोध्येतील मंदिराच्या नावावर उकळत होते पैसे; हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

संसद भवनाच्या निर्मितीसाठीही चंद्रपूरचे लाकूड
यापूर्वी देखील भारताच्या नव्या संसद भवन बांधकामासाठी बल्लारपूर आगारातून लाकूड खरेदी करण्यात आले होते. ग्लोरी ऑफ फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील जंगलातील हे उच्च दर्जाचे सागवान आहे. संसद भवनाचे सौंदर्य खुलविण्यात अत्यंत सुबक व देखण्या लाकडाने मोलाची भर घातली आहे. आता पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीत बल्लारपूर आगारातील सागवान वापरण्यात येणार असल्याने मंदिराच्या बांधकामात महाराष्ट्राचे देखील योगदान असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी